रायगड : सावरोली चारफाट्यावर कंपनीत चोरी; १.८९ लाखांचा माल लंपास
रायगड, 13 मार्च (हिं.स.)। खालापूर पोलीस ठाणे हद्दीत सावरोली चारफाटा परिसरातील एका कंपनीत अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून तब्बल १ लाख ८९ हजार रुपयांचा माल चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
Theft in a company at Savaroli Charphata; Goods worth 1.89 lakhs looted


रायगड, 13 मार्च (हिं.स.)। खालापूर पोलीस ठाणे हद्दीत सावरोली चारफाटा परिसरातील एका कंपनीत अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून तब्बल १ लाख ८९ हजार रुपयांचा माल चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चोरीची घटना घडली. खालापूर तालुक्यातील मौजे सावरोली चारफाटा येथील एमटीसी बिझनेस प्रा. लि. या कंपनीच्या परिसरात दोन अज्ञात इसमांनी कंपनीच्या भिंतीवरून (वॉल कंपाऊंड) आत प्रवेश केला. यानंतर त्यांनी कंपनीतील फिर्यादी यांच्या परवानगीशिवाय स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विविध साहित्य चोरी करून नेले. चोरीस गेलेल्या मालाची एकूण किंमत सुमारे १ लाख ८९ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

घटनेची माहिती मिळताच खालापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या प्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ९५/२०२६ नोंदविण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम ३०५(अ), ३३१(२) व ३(५) अन्वये अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार सांगळे करीत आहेत. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande