पालघर - खोडाळा येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ उत्साहात संपन्न
पालघर, 14 मार्च (हिं.स.)। सर्वसामान्य नागरिकांचे महसूल व शासन सेवांशी संबंधित प्रश्न तात्काळ निकाली काढण्यासाठी आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ टप्पा-१ अंतर्गत खोडाळा मंडळस्तरीय शिबीर आज ग्रामपंचायत कार्यालय, खोडाळा येथे उत्सा
खोडाळा येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ उत्साहात संपन्न


पालघर, 14 मार्च (हिं.स.)। सर्वसामान्य नागरिकांचे महसूल व शासन सेवांशी संबंधित प्रश्न तात्काळ निकाली काढण्यासाठी आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ टप्पा-१ अंतर्गत खोडाळा मंडळस्तरीय शिबीर आज ग्रामपंचायत कार्यालय, खोडाळा येथे उत्साहात पार पडले. शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी सभापती प्रदीप वाघ, अपर निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र राजपूत तसेच मिलिंद झोले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

या शिबिरामध्ये नागरिक व विद्यार्थ्यांसाठी विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या. यामध्ये जातीचे व डोमिसाईल दाखले वाटप, आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती, ७/१२ उतारा अद्ययावत करणे व डिजिटल ७/१२ वाटप, शिधापत्रिका लाभ, अभिलेख दुरुस्ती हेल्प डेस्क, अकृषिक सुधारणा मार्गदर्शन, प्रलंबित फेरफार निकाली काढणे अशा सेवा देण्यात आल्या.

तसेच सामाजिक अर्थसहाय्य योजनांचा लाभ, लोकसेवा हक्क कायद्यानुसार तत्काळ सेवा, कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती व लाभ, आयुष्मान भारत कार्ड नोंदणी व वाटप, नैसर्गिक आपत्ती अनुदानासाठी ई-केवायसी, मतदार नोंदणी व वगळणी या सेवाही नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या.

महिला व बालविकास विभागामार्फत विविध लाभांचे वाटप करण्यात आले. याशिवाय उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयाकडून सनद व ई-मोजणी प्रमाणपत्र वाटप, पंचायत समिती समाजकल्याण विभाग व पशुसंवर्धन विभागाच्या योजनांतील लाभार्थ्यांना लाभांचे वितरण करण्यात आले.

जिल्हा उद्योग केंद्रामार्फत उद्योजकतेसाठी विविध योजनांची माहिती देण्यात आली. तसेच आदिवासी विकास विभागाकडील योजनांची माहिती, कलम ८५ अर्ज, तुकडेबंदी कायदा व लक्ष्मीमुक्ती योजना बाबत मार्गदर्शन करण्यात आले.

या शिबिरामुळे नागरिकांना विविध शासकीय सेवा एका छताखाली मिळाल्याने मोठा दिलासा मिळाला असून, प्रशासनाच्या या उपक्रमाचे उपस्थित नागरिकांनी स्वागत केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL


 rajesh pande