पालघर - छ. शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात विविध सेवांचे वितरण
पालघर, 14 मार्च, (हिं.स.)। शासनाच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा-१’ अंतर्गत मनोर येथील लाल बहादूर शास्त्री हायस्कूल व महाविद्यालय येथे खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार विलास तरे यांच्या अध्यक्षतेखाली समाधान शिबीराचे आयोज
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात नागरिकांना विविध सेवांचे तत्काळ वितरण


पालघर, 14 मार्च, (हिं.स.)। शासनाच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा-१’ अंतर्गत मनोर येथील लाल बहादूर शास्त्री हायस्कूल व महाविद्यालय येथे खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार विलास तरे यांच्या अध्यक्षतेखाली समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात विविध शासकीय सेवा Single Day Service Delivery माध्यमातून तात्काळ उपलब्ध करून देण्यात आल्या.

या शिबिरास भूसंपादन उपजिल्हाधिकारी महेश सागर, प्रांताधिकारी श्याम मदनुरकर, तहसीलदार रमेश शेंडगे, गटविकास अधिकारी तसेच सर्व तालुकास्तरीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी परिसरातील नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून विविध सेवांचा लाभ घेतला.

शिबिरामध्ये नागरिकांना विविध दाखले, ७/१२ उतारे, ८-अ उतारे यांचे वितरण करण्यात आले. तसेच ७/१२ अद्यावत करणे, ई-मोजणी, पाणंद रस्त्यांबाबत कार्यवाही, अभिलेख दुरुस्ती हेल्पडेस्क, अकृषिक सुधारणा मार्गदर्शन, पीएम किसान योजना, दुय्यम शिधापत्रिका वाटप, प्रलंबित फेरफार निकाली काढणे, तुकडेबंदी कायद्याअंतर्गत कार्यवाही, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचा लाभ, आरोग्य तपासणी, मोफत डिजिटल सातबारा, वनपट्ट्यावर सातबारा नावे नोंद करणे, लक्ष्मी मुक्ती योजना, प्रॉपर्टी कार्ड आदी विविध सेवा नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या.

या उपक्रमामुळे महसूल विभागाशी संबंधित अनेक प्रलंबित प्रश्नांचा तात्काळ निपटारा होत असून नागरिकांना शासकीय सेवा सुलभ, पारदर्शक आणि जलदगतीने मिळत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. शासनाचा हा उपक्रम सर्वसामान्य नागरिक, शेतकरी व लाभार्थ्यांसाठी मोठा दिलासा ठरत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL


 rajesh pande