परभणी - विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळ आवश्यक : कुलगुरू
परभणी, 14 मार्च, (हिं.स.)। वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथे परभणी व हिंगोली जिल्ह्यातील आंतर कृषि तंत्र विद्यालयीन क्रीडा स्पर्धा 2026 उत्साहात पार पडल्या. स्पर्धेचे उद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभ विद्यापीठाच्या क्रीडांगणावर आयोजित करण्
Q


Q


परभणी, 14 मार्च, (हिं.स.)। वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथे परभणी व हिंगोली जिल्ह्यातील आंतर कृषि तंत्र विद्यालयीन क्रीडा स्पर्धा 2026 उत्साहात पार पडल्या. स्पर्धेचे उद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभ विद्यापीठाच्या क्रीडांगणावर आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व उद्घाटक म्हणून विद्यापीठाचे कुलगुरू इंद्र मणि उपस्थित होते. त्यांच्या हस्ते क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सहयोगी अधिष्ठाता (शिक्षण) डॉ. गजेंद्र लोंढे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, कृषि तंत्र विद्यालय परभणीचे प्राचार्य डॉ. संतोष पिल्लेवाड तसेच क्रीडा अधिकारी डॉ. संघर्ष श्रृंगारे उपस्थित होते.

कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या जीवनातील सर्वांगीण विकासासाठी खेळ अत्यंत आवश्यक आहे. खेळामुळे शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच व्यक्तिमत्त्व विकास, संघभावना, शिस्त, नेतृत्वगुण आणि आत्मविश्वास वाढीस लागतो. आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात कृषि तंत्र शिक्षणाचे महत्त्व वाढले असून विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान आत्मसात करत शिक्षणासोबत क्रीडा क्षेत्रातही प्राविण्य मिळवावे. स्पर्धेमुळे जिंकण्याची जिद्द, पराभव स्वीकारण्याची तयारी आणि आव्हानांना सामोरे जाण्याची मानसिकता विकसित होते, असेही त्यांनी नमूद केले.

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande