जळगाव मनपाची धडक कारवाई; तीन तासांत २० लाख रुपयांचा थकीत कर वसूल
जळगाव, 14 मार्च (हिं.स.)महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाने थकबाकीदारांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला असून, एमआयडीसी परिसरात मोठी कारवाई करण्यात आली. अवघ्या तीन तासांच्या कालावधीत पथकाने तब्बल २० लाख रुपयांचा थकीत कर वसूल केला. या कारवाईदरम्यान कर
जळगाव मनपाची धडक कारवाई; तीन तासांत २० लाख रुपयांचा थकीत कर वसूल


जळगाव, 14 मार्च (हिं.स.)महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाने थकबाकीदारांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला असून, एमआयडीसी परिसरात मोठी कारवाई करण्यात आली. अवघ्या तीन तासांच्या कालावधीत पथकाने तब्बल २० लाख रुपयांचा थकीत कर वसूल केला. या कारवाईदरम्यान कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या दोन मोठ्या कंपन्यांना सील ठोकण्यात आले आहे. मात्र, कारवाईची तीव्रता पाहून संबंधित मालकांनी तातडीने थकीत रक्कम भरल्याने काही वेळानंतर हे सील काढण्यात आले. अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली. अनेक कंपन्यांनी जप्तीची कारवाई टाळण्यासाठी तत्काळ धनादेश किंवा रोख स्वरूपात कर भरले. ज्या कंपन्यांची थकबाकी अद्याप मोठी आहे, त्यांना तातडीने कर भरण्याचे आदेश देण्यात आले असून हलगर्जीपणा केल्यास थेट जप्तीची टांगती तलवार त्यांच्यावर राहणार आहे. या मोहिमेत प्रभाग अधिकारी मनोज वन्नेरे, शाखा अभियंता प्रकाश पाटील, चंद्रशेखर कोळी, चेतन खोंडे यांच्यासह कर विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते.१९ मार्चपर्यंत संधी; अन्यथा जप्ती अटळ महानगरपालिकेच्यावतीने राबविण्यात येत असलेली शास्ती योजना १९ मार्चपर्यंत सुरू आहे. थकबाकीदारांनी या योजनेचा लाभ घेऊन आपला दंड वाचवावा, अन्यथा १९ मार्चनंतर मालमत्ता सील करणे किंवा जप्तीची कारवाई अधिक तीव्र केली जाईल, असा इशारा सहायक आयुक्त शोभा बाविस्कर यांनी दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande