इराण-अमेरिका-इस्रायल संघर्ष १६व्या दिवशीही सुरूच
तेहरान , 15 मार्च (हिं.स.)।अमेरिका–इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्याचा आज १६वा दिवस आहे. मध्यपूर्वेत सुरू असलेला तणाव आता आणखी तीव्र होत चालला आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे की सध्याच्या अटींवर ते इराणसोबत कोणताही कर
इराण-अमेरिका-इस्रायल संघर्ष १६व्या दिवशीही सुरूच


तेहरान , 15 मार्च (हिं.स.)।अमेरिका–इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्याचा आज १६वा दिवस आहे. मध्यपूर्वेत सुरू असलेला तणाव आता आणखी तीव्र होत चालला आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे की सध्याच्या अटींवर ते इराणसोबत कोणताही करार करण्याच्या बाजूने नाहीत. दरम्यान, इराणी सैन्याने मागे हटण्याऐवजी खाडी देशांच्या बंदरांवर हल्ला करण्याचा थेट इशारा दिला आहे. मध्यपूर्वेतील या वाढत्या तणावामुळे जग एका मोठ्या संकटाकडे वाटचाल करत असून त्याचा परिणाम सामान्य लोकांच्या खिशावरही दिसू लागला आहे.

या तणावाच्या पार्श्वभूमीवर स्ट्रेट ऑफ होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजांवर इराणकडून सातत्याने हल्ले होत आहेत. या हल्ल्यांमध्ये भारताकडे येणारी जहाजेही समाविष्ट आहेत. मात्र आता इराणने एलपीजीने भरलेले दोन टँकर स्ट्रेट ऑफ होर्मुजमधून भारताकडे जाण्यासाठी हिरवा कंदील दिला आहे.

शुक्रवारी भारतातील इराणचे राजदूत मोहम्मद फतहअली यांनी संकेत दिले की, जगातील सर्वात महत्त्वाच्या समुद्री मार्गांपैकी एक असलेल्या स्ट्रेट ऑफ होर्मुजमधून भारतासाठी तेल वाहतुकीस सुरक्षित मार्ग दिला जाईल.

इराणचे परराष्ट्र मंत्री सैयद अब्बास अराघची यांनी म्हटले की हा महत्त्वाचा जलमार्ग फक्त तेहरानच्या शत्रूंकरिता बंद आहे. तसेच, इराणच्या तेल निर्यातीसाठी महत्त्वाच्या असलेल्या खार्ग बेटावर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यानंतर इराणी सैन्याने इशारा दिला आहे की ते संयुक्त अरब अमिरातीच्या बंदरांना लक्ष्य करू शकतात. स्ट्रेट ऑफ होर्मुज संदर्भात डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की चीन, फ्रान्स, जपान, दक्षिण कोरिया, ब्रिटन आणि इतर देशांनी या जलडमरूमध्यातील जहाजवाहतूक मार्ग खुले ठेवण्यासाठी आपली युद्धनौका पाठवाव्यात, अशी अपेक्षा आहे. मात्र या मोहिमेत सहभागी होण्याबाबत बीजिंग किंवा लंडन यांनी अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी केलेली नाही.

डोनाल्ड ट्रम्प यांनी माध्यमाला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की ते इराणसोबत करार करण्यास तयार नाहीत, कारण सध्याच्या अटी पुरेशा अनुकूल नाहीत. त्यांनी हेही म्हटले की अमेरिका इराणच्या खार्ग बेटावर आणखी काही वेळा हल्ले करू शकते.

मध्यपूर्वेत तणाव कायम आहे. अमेरिका आणि इस्रायल इराणवर हल्ले करत आहेत, तर इराण आणि हिझबुल्लाह इस्रायल आणि खाडी देशांवर मिसाइल आणि ड्रोनद्वारे हल्ले करत आहेत. रविवारी पहाटे मध्य इस्रायलमधील अनेक ठिकाणी स्फोटक दारुगोळा पडला. या घटनेनंतर आपत्कालीन सेवांच्या कर्मचाऱ्यांनी दोन जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवले.

इराणकडून करण्यात आलेल्या मिसाइल आणि ड्रोन हल्ल्यांपैकी अनेक हल्ले संयुक्त अरब अमिरात, कतार आणि सौदी अरेबिया यांनी निष्फळ ठरवले. मात्र कुवैतच्या विमानतळाला या हल्ल्यांमध्ये काही प्रमाणात नुकसान झाले आहे. इराणच्या सरकारी माध्यमांच्या वृत्तानुसार, इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सने शनिवारी इशारा देत अमेरिकेला या प्रदेशातील अमेरिकन औद्योगिक प्रकल्प हटवण्याचे आवाहन केले. तसेच ज्या भागांमध्ये अमेरिकन भागधारक असलेल्या कंपन्या आहेत, तेथील नागरिकांनी संभाव्य हानी टाळण्यासाठी ती ठिकाणे रिकामी करावीत, असेही सांगितले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande