होर्मुज सामुद्रधुनी खुली, पण अमेरिका-इस्रायल जहाजांसाठी बंद — अब्बास अराघची
तेहरान , 15 मार्च (हिं.स.)।इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी शनिवारी मोठे वक्तव्य करत सांगितले की होर्मुज सामुद्रधुनी खुली आहे आणि हा रणनीतिक समुद्री मार्ग फक्त अमेरिका आणि इस्रायलच्या जहाजांसाठी बंद आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट
होर्मुज सामुद्रधुनी खुली, पण अमेरिका-इस्रायल जहाजांना बंद — अब्बास अराघची


तेहरान , 15 मार्च (हिं.स.)।इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी शनिवारी मोठे वक्तव्य करत सांगितले की होर्मुज सामुद्रधुनी खुली आहे आणि हा रणनीतिक समुद्री मार्ग फक्त अमेरिका आणि इस्रायलच्या जहाजांसाठी बंद आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील प्रमुख शक्तींना होर्मुज सामुद्रधुनीत आपली नौदलाची जहाजे तैनात करण्याचे आवाहन केल्यानंतर अराघची यांचे हे वक्तव्य समोर आले आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे की, कोणत्याही परिस्थितीत अमेरिका हा महत्त्वाचा समुद्री मार्ग खुला ठेवेल.

एका संवादादरम्यान अराघची म्हणाले, “होर्मुज सामुद्रधुनी खुली आहे. ती फक्त आमचे शत्रू असलेल्या अमेरिका आणि त्यांच्या सहयोगी देशांच्या टँकर व जहाजांसाठी बंद आहे. इतर सर्व देशांसाठी ये-जा करण्यावर कोणतीही बंदी नाही.”होर्मुजमधील इराणी नाकेबंदीबाबत विचारलेल्या प्रश्नावर अराघची म्हणाले की, सुरक्षेच्या चिंतेमुळे ही नाकेबंदी करण्यात आली आहे.

रशिया आणि चीनबाबत बोलताना अराघची म्हणाले, “रशिया आणि चीन हे आमचे रणनीतिक भागीदार आहेत. भूतकाळात आमचे घनिष्ठ सहकार्य राहिले असून ते अजूनही सुरू आहे. यामध्ये लष्करी सहकार्याचाही समावेश आहे.”

दरम्यान, इराणच्या एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने सांगितले की जगात तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला होर्मुज सामुद्रधुनीचा मार्ग अद्याप खुला आहे आणि त्यावर इराणचे नियंत्रण कायम आहे. इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरजीसी)च्या नौदलाचे कमांडर अलीरेजा तंगसीरी यांनी एका निवेदनात सांगितले की, अमेरिकेकडून केले जाणारे दावे चुकीचे आहेत.

त्यांनी म्हटले की अमेरिका असा दावा करत आहे की त्यांनी इराणची नौदल शक्ती नष्ट केली असून तेलवाहू जहाजांना सुरक्षित मार्ग देऊ शकतात, मात्र हे दावे खरे नाहीत. चीनची वृत्तसंस्थाने इराणच्या न्यूज एजन्सीचा हवाला देत ही माहिती दिली आहे.

निवेदनात असेही सांगण्यात आले की होर्मुज सामुद्रधुनी लष्करीदृष्ट्या बंद करण्यात आलेली नाही, तर ती केवळ इराणच्या नियंत्रणाखाली आहे. होर्मुज सामुद्रधुनी हा अत्यंत महत्त्वाचा रणनीतिक समुद्री मार्ग मानला जातो. जगातील जवळपास पाचव्या भागाचे तेल याच मार्गाने वाहतूक केले जाते.

इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांनी आपल्या पहिल्याच संदेशात सांगितले की, या सामुद्रधुनीवर इराण आपला प्रभाव कायम ठेवेल.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी त्या देशांना आवाहन केले आहे जे या मार्गाने तेल आयात करतात. त्यांनी सांगितले की या समुद्री मार्गाला खुला ठेवण्याची जबाबदारी या देशांनी घ्यावी आणि अमेरिका त्यांना मदत करेल.

सध्या अमेरिका वाढत्या तेलाच्या किंमती कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. अलीकडेच अमेरिका आणि इस्रायल यांनी एकत्रितपणे इराणवर हल्ले केले होते, त्यानंतर इराणनेही संपूर्ण प्रदेशातील अमेरिकेच्या तळांवर प्रत्युत्तरात्मक कारवाई सुरू केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande