परभणीच्या सह्याद्रीची बुद्धिबळात चमकदार कामगिरी; राज्यस्तरीय स्पर्धेत तृतीय क्रमांक
परभणी, 15 मार्च (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘महाराष्ट्र राज्य अंडर-१७ ओपन आणि गर्ल्स सिलेक्शन फिडे रेटेड चेस चॅम्पियनशिप’ स्पर्धेत परभणीच्या सह्याद्री हेमंतराव घाटगे हिने उल्लेखनीय कामगिरी करत ११ वर्षांखालील वयोगटात राज्य
परभणीच्या सह्याद्रीची बुद्धिबळात चमकदार कामगिरी; राज्यस्तरीय स्पर्धेत तृतीय क्रमांक


परभणी, 15 मार्च (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘महाराष्ट्र राज्य अंडर-१७ ओपन आणि गर्ल्स सिलेक्शन फिडे रेटेड चेस चॅम्पियनशिप’ स्पर्धेत परभणीच्या सह्याद्री हेमंतराव घाटगे हिने उल्लेखनीय कामगिरी करत ११ वर्षांखालील वयोगटात राज्यस्तरावर तृतीय क्रमांक पटकावला आहे. तिच्या या यशामुळे परभणी शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

सह्याद्री ही परभणी येथील समर्थ चेस अकॅडमीची विद्यार्थिनी असून, तिने अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विविध स्तरांतून तिचे कौतुक होत आहे. सह्याद्रीच्या या यशामागे समर्थ चेस अकॅडमीचे प्रशिक्षक अनुराज रासकटला यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्रीने सातत्यपूर्ण सराव करून ही कामगिरी साध्य केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande