पहिल्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेची न्यूझीलंडवर ७ विकेट्सने मात
वेलिंग्टन, 15 मार्च (हिं.स.)पहिल्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडचा ७ विकेट्सने पराभव केला. २०२६ च्या टी-२० सामन्याच्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेने आपल्या पराभवाचा बदला घेतला. माउंट मौंगानुई येथील बे ओव्हल येथे खेळल्या गेलेल्या या
दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संघ


वेलिंग्टन, 15 मार्च (हिं.स.)पहिल्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडचा ७ विकेट्सने पराभव केला. २०२६ च्या टी-२० सामन्याच्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेने आपल्या पराभवाचा बदला घेतला.

माउंट मौंगानुई येथील बे ओव्हल येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण हा निर्णय अयशस्वी ठरला. किवी संघ १४.३ षटकांत फक्त ९१ धावांवर सर्वबाद झाला. न्यूझीलंडची टी-२० सामन्यातील ही १० वी सर्वात कमी धावसंख्या आहे.

दक्षिण आफ्रिकेने १६.४ षटकांत ३ विकेट्स गमावून लक्ष्य गाठले आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. मालिकेतील दुसरा सामना १७ मार्च रोजी हॅमिल्टनमध्ये खेळला जाणार आहे.

या सामन्यात न्यूझीलंडकडून जेम्स नीशमने सर्वाधिक २१ चेंडूत २६ धावा केल्या. कर्णधार मिशेल सँटनरने १९ चेंडूत १५ धावा, कोल मॅककॉन्चीने ११ चेंडूत १५ धावा आणि बेव्हॉन जेकब्सने ७ चेंडूत १० धावा केल्या. पण सात फलंदाज दुहेरी आकडी गाठू शकले नाहीत. न्यूझीलंडची सर्वाधिक भागीदारी ७ व्या विकेटसाठी झाली, जेव्हा नीशम आणि मॅककॉन्चीने १७ चेंडूत २६ धावा जोडल्या.

दक्षिण आफ्रिकेकडून पदार्पण करणाऱ्या न्कोबानी मोकोएनाने ३.३ षटकांत २६ धावा देत सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. गेराल्ड कुट्झी आणि ओटनील बार्टमन यांनी ३ षटकांत प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. फिरकी गोलंदाज केशव महाराजनेही किफायतशीर गोलंदाजी करत ४ षटकांत २५ धावा देत २ विकेट्स घेतल्या.

दक्षिण आफ्रिकेने १६.४ षटकांत ९२ धावांचे लक्ष्य गाठले. दक्षिण आफ्रिकेकडून कॉनर एस्टरहुइझेनने सर्वाधिक ४५ धावा केल्या आणि तो नाबाद राहिला. डायन फॉरेस्टर १६ धावांवर नाबाद राहिला. न्यूझीलंडकडून काइल जेमीसन, झाचेरी फॉल्केस आणि मिशेल सँटनर यांनी प्रत्येकी एकेक विकेट घेतली.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande