पाकिस्तानचा माजी कर्णधार सरफराज अहमदची निवृत्तीची घोषणा
इस्लामाबाद, 15 मार्च (हिं.स.) - पाकिस्तानचा माजी कर्णधार सरफराज अहमदने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. हा यष्टीरक्षक-फलंदाज भारताविरुद्ध दोन मोठ्या आयसीसी स्पर्धांचे अंतिम सामने जिंकणाऱ्या काही पाकिस्तानी कर्णधारांपैकी एक आहे. स
सरफराज अहमद


इस्लामाबाद, 15 मार्च (हिं.स.) - पाकिस्तानचा माजी कर्णधार सरफराज अहमदने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. हा यष्टीरक्षक-फलंदाज भारताविरुद्ध दोन मोठ्या आयसीसी स्पर्धांचे अंतिम सामने जिंकणाऱ्या काही पाकिस्तानी कर्णधारांपैकी एक आहे. सरफराजने डिसेंबर २०२३ मध्ये पर्थ येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होचा. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) जारी केलेल्या निवेदनात त्याने निवृत्तीची घोषणा केली.

सरफराजच्या औपचारिक निवृत्तीनंतर पीसीबी त्याला पाकिस्तान कसोटी संघाचे दीर्घकालीन मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त करू शकते. गेल्या वर्षी बोर्डाने अंतरिम मुख्य प्रशिक्षक अझहर महमूद यांचा करार रद्द केल्यामुळे कसोटी संघाचे मुख्य प्रशिक्षकपद सध्या रिक्त आहे. मे महिन्यात ३९ वर्षांचा होणारा सरफराजला अलीकडेच राष्ट्रीय निवड समितीचा सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्याला पाकिस्तान अंडर-१९ आणि शाहीन संघांचे मार्गदर्शक आणि व्यवस्थापक म्हणूनही नियुक्त करण्यात आले आहे.

कराचीमध्ये जन्मलेल्या सरफराजने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, पाकिस्तानचे नेतृत्व करणे हे त्याच्यासाठी स्वप्न होते. २००६ चा आयसीसी अंडर-१९ क्रिकेट विश्वचषक आणि २०१७ ची आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणे हे त्याच्या कारकिर्दीतील सर्वात संस्मरणीय क्षण होते असे तो म्हणाला. सरफराज अहमदने पाकिस्तानसाठी ५४ कसोटी, ११७ एकदिवसीय आणि ६१ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आणि तिन्ही फॉरमॅटमध्ये १०० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले. तो म्हणाला की त्याच्या कारकिर्दीत तो नेहमीच निर्भय क्रिकेट खेळण्याचा आणि संघात एकता राखण्याचा प्रयत्न करत असे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande