नाशिक - श्रीराज, प्रणव, वेदिका यांची राष्ट्रीय सेपक टकरा स्पर्धेसाठी निवड
राष्ट्रीय स्पर्धेत चांगली कामगिरी करू असा खेळाडूंना विश्वास नाशिक, 15 मार्च (हिं.स.)। २३ ते २७ मार्च, २९२६ दरम्यान रांची- झारखंड येथे २८ व्या राष्ट्रीय सेपक टकरा अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महाराष्ट्राच्य
Shriraj, Pranav, Vedika selected


Shriraj, Pranav, Vedika selected


Shriraj, Pranav, Vedika selected


राष्ट्रीय स्पर्धेत चांगली कामगिरी करू असा खेळाडूंना विश्वास

नाशिक, 15 मार्च (हिं.स.)। २३ ते २७ मार्च, २९२६ दरम्यान रांची- झारखंड येथे २८ व्या राष्ट्रीय सेपक टकरा अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महाराष्ट्राच्या संघांमध्ये नाशिकच्या श्रीराज निकम -पाटील, प्रणव दातीर आणि वेदिका महाले या तीन खेळाडूंची महाराष्ट्राच्या संघामध्ये निवड करण्यात अली आहे. श्रीराज निकम -पाटील हा काका साहेब देवधर देवदार इंग्लिश मिडीयम स्कुलचा विद्यार्थी आहे, तर प्रणव दातीर आणि वेदिका महाले हे नवजीवन डे स्कूल चे विद्यार्थी आहेत.

महाराष्ट्राच्या संघामध्ये निवड झालेल्या खेळाडूंचे सराव शिबिर वर्धा येथे १६ ते २१ मार्चपर्यंत सुरु राहणार आहे, त्यानंतर तेथूनच महाराष्ट्राचे संघ रांचीसाठी रवाना होणार असल्याचे राज्य संघटनेने कळविले आहे.

श्रीराज निकम- पाटील हा काकासाहेब देवधर इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी असून त्याला स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ भारती पाटील, सतीश शिंपी आणि सर्व शिक्षकांनी शुभेच्छा दिल्या. श्रीराजला स्कूलचे क्रीडा प्रशिक्षक मोहम्मद कैफ शेख यांचे मार्गदर्शन लाभत आहे. प्रणव दातीर आणि वेदिका महाले हे नवजीवन डे स्कूलचे विद्यार्थी असून यांना भूषण सोन्नीस यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

या खेळाडूंची निवड झाल्याबद्दल नाशिक पूर्वचे आमदार ऍड. राहुल ढिकले, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अशोक दुधारे, आनंद खरे, जिल्हा सेपक टकरा संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत बनकर, सरचिटणीस दीपक निकम, योगेश नाटकर, अनिल गायकवाड, ओझर नगर परिषदेचे नगरसेवक अशोक कदम, दीपक पाटील, वैभव वडजे, सागर कातड, भाजयुमोचे शहराध्यक्ष प्रवीण भाटे आदींनी शुभेच्छा दिल्या. सर्व खेळाडू वर्धा येथील सराव शिबिरासाठी रवाना झाले आहेत. महाराष्ट्राच्या मुलांच्या संघांचे मार्गदर्शक म्हणून रविकुमार बकवाड, संघ व्यवस्थापक म्हणून अण्णा वाकडे तर मुलींच्या संघाचे मार्गदर्शक दर्शन हस्ती, व्यवस्थापक सौ. सारिका बकवाड काम बघणार आहेत. शिबिरा दरम्यान राष्ट्रीय प्रशिक्षक योगेंद्र पांडे, विनय मून, श्रीमती अमृता पांडे यांचे मार्गदर्शन खेळाडूंना लाभणार आहे.

राष्ट्रीय स्पर्धेत आम्ही सर्व खेळाडू महाराष्ट्राला नक्कीच प्राविण्य मिळवून देऊ असा विश्वास खेळाडूंनी व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande