घरफोडी गुन्ह्यातील आरोपी ताब्यात – ६.५० लाख रुपये किमतीचे दागिने जप्त
लातूर, 17 मार्च (हिं.स.)। लातूर जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने किल्लारी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा यशस्वी उलगडा करत एका आरोपीस ताब्यात घेत मोठ्या प्रमाणात चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे.
पोलीस कारवाई


लातूर, 17 मार्च (हिं.स.)। लातूर जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने किल्लारी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा यशस्वी उलगडा करत एका आरोपीस ताब्यात घेत मोठ्या प्रमाणात चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, किल्लारी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. २८३/२०२५ अन्वये भा.न्या.सं. कलम ३३१ (३), ३०५ (अ) प्रमाणे घरफोडी व चोरीचा गुन्हा दाखल होता. सदर गुन्ह्याचा तपास सुरु असताना पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशान्वये व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर (स्थानिक गुन्हे शाखा, लातूर) यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक नेमण्यात आले होते.

दिनांक १६/०३/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आरोपींचा शोध घेत असताना राजीव गांधी चौक, लातूर परिसरात बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, कन्हेरी चौक, लातूर रिंग रोडवरील एका पान टपरीसमोर एक इसम चोरीचे सोन्याचे दागिनेसह थांबलेला आहे. प्राप्त माहितीच्या आधारे पथकाने तात्काळ सापळा रचून पंचांच्या इसम नामे सोहेल मुस्तफा शेख (वय २६ वर्षे, रा. बाभळगाव, ता. जि. लातूर) यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्या ताब्यातून सोन्याचे दागिने आढळून आले. चौकशीदरम्यान त्याने कबुली दिली की, बबन उर्फ राजाराम धोंडीराम बुधवाडे (वय अंदाजे ३२ वर्षे, रा. बाभळगाव, ता. जि. लातूर) (सध्या फरार) याने मौजे किल्लारी येथे दिवसा बंद घर फोडून चोरी केलेले सोन्याचे दागिने त्याच्याकडे विक्रीसाठी दिले होते.

आरोपीकडून खालीलप्रमाणे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले –

५ तोळे वजनाच्या सोन्याच्या पाटल्या (किंमत अंदाजे ₹६,१०,०००/-)

५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी (किंमत अंदाजे ₹३०,०००/-)

१ ग्रॅम ८०० मिली वजनाचे कानातील सोन्याचे फुले (किंमत अंदाजे ₹१०,८००/-)

अशा एकूण ५ तोळे ६ ग्रॅम ८०० मिली वजनाचे अंदाजे ₹६,५०,८००/- किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. जप्त मुद्देमालासह किल्लारी पोलीस ठाण्यात पुढील कायदेशीर कारवाईसाठी हजर करण्यात आले आहे. सदर गुन्ह्यातील फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक कार्यरत आहे.

ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक, लातूर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली सपोनी अमित कुमार पुणेकर, पोउपनि राजेश घाडगे, पोउपनि अमर केंद्रे, पोलीस अंमलदार राजेश कंचे, मोहन सुरवसे, प्रदीप स्वामी, जमीर शेख, शैलेश सुडे, राहुल कांबळे, धनंजय गुट्टे, गोरोबा इंगोले, सुहास जाधव, सलाजित पांचाळ , महिला पोलीस अंमलदार अंजली गायकवाड आदींच्या पथकाने पार पाडली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande