नाशिक - परिचिताने केली महिलेची २० लाख रुपयांची फसवणूक
नाशिक, 17 मार्च (हिं.स.)। बँकेचा एकही हप्ता न भरता ट्रॅक्टरची परस्पर विल्हेवाट लावून ट्रॅक्टर व दिलेल्या २० लाख ४० हजार रुपयांचा अपहार करून महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अश
नाशिक - परिचिताने केली महिलेची २० लाख रुपयांची फसवणूक


नाशिक, 17 मार्च (हिं.स.)। बँकेचा एकही हप्ता न भरता ट्रॅक्टरची परस्पर विल्हेवाट लावून ट्रॅक्टर व दिलेल्या २० लाख ४० हजार रुपयांचा अपहार करून महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी संजीवनी विजय भकरे (रा. गोविंदा पार्क, नरहरीनगर, पाथर्डी शिवार) व आरोपी नितीन सुकदेव गवते (रा. वाडीव-हे, सध्या रा. स्वराज्यनगर, पाथर्डी शिवार) हे दोघे एकमेकांचे परिचित आहेत. आरोपी गवते याने फिर्यादी महिलेचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून वेळोवेळी फोन पेद्वारे व फिर्यादीच्या बँक खात्यातून एटीएमद्वारे एकूण २० लाख ४० हजार ९५ रुपये घेऊन विश्वासघात करीत महिलेची आर्थिक फसवणूक केली, तसेच दि. २५ जून २०२४ रोजी आयसीआयसीआय बँकेच्या बोधलेनगर शाखेतून ५ लाख ९२ हजार १४९ रुपयांचे कर्ज घेऊन त्या कर्जातून सिन्नर येथील

माधवलक्ष्मी ऑटोमोबाईल्स या दुकानातून एमएच १५ जेएक्स ०५२१ या क्रमांकाचा सोनालिका कंपनीचा ट्रॅक्टर घेतला; मात्र बँकेकडून घेतलेल्या कर्जाचा एकही हप्ता न भरता ट्रॅक्टरची परस्पर विल्हेवाट लावून ट्रॅक्टरसह दिलेल्या पैशांचा अपहार करून फसवणूक केली, तसेच फिर्यादी महिलेने आरोपी गवते याच्याकडे पैशाची मागणी केली असता त्याने उलट महिलेला शिवीगाळ करून दमदाटी केली. हा प्रकार दि. ८ मार्च २०२२ ते दि. २ मे २०२४ या कालावधीत पाथर्डी शिवारात घडला. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात नितीन गवतेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार पवार करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande