रत्नागिरी : फेसबुक मैत्रीतून अल्पवयीन मुलीचा गैरफायदा घेणारे तिघे अटकेत
रत्नागिरी, 17 मार्च, (हिं. स.) : राजापूर तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीशी फेसबुकवर ओळख निर्माण करून तिचा गैरफायदा घेत शारीरिक अत्याचार व अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी तिघांविरोधात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सिंधुदुर्ग जिल्ह्य
रत्नागिरी : फेसबुक मैत्रीतून अल्पवयीन मुलीचा गैरफायदा घेणारे तिघे अटकेत


रत्नागिरी, 17 मार्च, (हिं. स.) : राजापूर तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीशी फेसबुकवर ओळख निर्माण करून तिचा गैरफायदा घेत शारीरिक अत्याचार व अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी तिघांविरोधात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात घडल्याने राजापूर पोलिसांनी शून्य क्रमांकाने गुन्हा नोंद करून पुढील तपासासाठी वैभववाडी पोलिसांकडे वर्ग केला आहे. या प्रकरणातील तिन्ही संशयितांना वैभववाडी पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित मुलीची फेसबुकद्वारे ओंकार सुर्वे (रा. नेर्ले, ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग) याच्याशी ओळख झाली होती. जुलै २०२५ मध्ये ती ओंकार सुर्वे व त्याचा चुलत भाऊ मयूर सुर्वे यांच्यासोबत वैभववाडी तालुक्यातील नापणे येथील धबधबा परिसरात गेली होती. वेळ झाल्याने तिला मयूर सुर्वे यांच्या जुन्या घरी नेण्यात आले. तेथे मयूर सुर्वेने तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला, तर ओंकार सुर्वेने जबरदस्तीने संबंध ठेवले. तसेच तिच्या नकळत मोबाइलवर व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यात आले.

गेल्या १४ मार्च २०२६ रोजी पंकज पवार (रा. ताम्हणे, ता. राजापूर) याने संबंधित मुलीशी संपर्क साधून तो अश्लील व्हिडीओ पाठवत धमकी दिली. “माझी मागणी मान्य केली नाही तर व्हिडीओ व्हायरल करीन,” असे सांगून दबाव टाकल्याचे समोर आले. या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने आपल्या बहिणीशी संपर्क साधून सर्व घटना सांगितली. बहिणीच्या धीरामुळे तिने दि. १५ मार्च रोजी राजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घटनास्थळ वैभववाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने पुढील तपास तेथे सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande