
नवी दिल्ली, 17 मार्च (हिं.स.)सर्वकालीन सर्वश्रेष्ठ टी२० क्रिकेटपटू कोण आहे? या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी एबी डिव्हिलियर्सपेक्षा उत्तम कोण असू शकेल – जो स्वतः या किताबाचा दावेदार आहे? या दिग्गज दक्षिण आफ्रिकी क्रिकेटपटूने अनेक लीगमध्ये आणि सर्व प्रमुख क्रिकेट खेळणाऱ्या देशांमध्ये खेळला आहे. तो प्रसिद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाचा भाग होता, ज्यात ख्रिस गेल आणि विराट कोहलीसारखे क्रिकेटपटू होते. आयपीएलमध्ये, त्यांचा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ससारख्या संघांशी झाला. तरीही, जेव्हा सर्वकालीन सर्वश्रेष्ठ टी२० क्रिकेटपटू निवडण्याची वेळ आली, तेव्हा डिव्हिलियर्सने एका गोलंदाजाची निवड केली.
सर्वकालीन सर्वश्रेष्ठ टी२० क्रिकेटपटू कोण आहे? यावर डिव्हिलियर्स म्हणाला. हे एक वादग्रस्त... नाही, वादग्रस्त नाही, पण एक रंजक उत्तर असेल, कारण मला वाटते की तो जसप्रीत बुमराह आहे. पण जेव्हा तो मला गोलंदाजी करत असतो तेव्हा नाही. त्याचं सातत्य. २० षटकांच्या फॉरमॅटमध्ये कोणत्याही टप्प्यावर गोलंदाजी करण्याची आणि दबावाखाली बळी घेण्याची त्याची क्षमता, नव्या चेंडूने, जुन्या चेंडूने, कशानेही. सुपर ओव्हर—तुम्ही त्याच्या हातात चेंडू द्या; तो तुम्हाला सामना जिंकवून देईल. तोच जसप्रीत बुमराह, असे ते पुढे म्हणाला.
एकीकडे सर्वोत्कृष्ट टी-२० फलंदाजांपैकी एक असलेला डिव्हिलियर्स बुमराहला सर्वकालीन महान म्हणत आहे, तर दुसरीकडे पाकिस्तानचे वरिष्ठ निवडकर्ता आकिब जावेद यांनी एक विचित्र विधान केले आहे. बुमराहच्या अनोख्या गोलंदाजी शैलीचे कौतुक करताना, आकिब जावेद यांनी त्याची तुलना पाकिस्तानचा मिस्ट्री स्पिनर उस्मान तारिकशी केली. मात्र, ही तुलना क्रिकेट चाहत्यांना रुचली नाही आणि आकिबवर जोरदार टीका झाली. बुमराहसारख्या जागतिक दर्जाच्या वेगवान गोलंदाजाची तुलना तुलनेने कमी प्रसिद्ध असलेल्या क्रिकेटपटूशी करणे हास्यास्पद आहे, असे चाहते म्हणाले. पाकिस्तानच्या दिग्गज वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेल्या शोएब अख्तरने तर सामन्यातील जागरूकतेच्या बाबतीत बुमराहची तुलना स्विंगचा बादशाह वसीम अक्रमशी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे