बीएलओ घरोघरी जाऊन भरून घेणार मतदारांकडून फॉर्म 'एसआयआर'ची तयारी पूर्ण
छत्रपती संभाजीनगर, 18 मार्च (हिं.स.)। राज्यात लवकरच मतदार यादी विशेष पुनरिक्षण (एसआयआर) होणार असून त्याची पूर्व तयारी प्रशासनाकडून करण्यात आली आहे. ही प्रक्रिया कशा पद्धतीने राबविण्यात येणार आहे? त्यामध्ये कोणाची भूमिका काय राहणार आहे, याची माहित
बीएलओ घरोघरी जाऊन भरून घेणार मतदारांकडून फॉर्म 'एसआयआर'ची तयारी पूर्ण


छत्रपती संभाजीनगर, 18 मार्च (हिं.स.)।

राज्यात लवकरच मतदार यादी विशेष पुनरिक्षण (एसआयआर) होणार असून त्याची पूर्व तयारी प्रशासनाकडून करण्यात आली आहे. ही प्रक्रिया कशा पद्धतीने राबविण्यात येणार आहे? त्यामध्ये कोणाची भूमिका काय राहणार आहे, याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना दिली. यावेळी एसआयआरबद्दल सविस्तर माहिती दिली.

यावेळी जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले, की निवडणूक आयोगाकडून अद्याप एसआयआरची तारीख जाहीर झालेली नाही. मात्र, त्यासाठी लागणारी पूर्व तयारी प्रशासनाने केली आहे. जिल्ह्यात ३२६४ मतदान केंद्र आहेत. प्रत्येक मतदार संघासाठी एक बीएलओ या प्रमाणे नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक १० बीएलओच्या मागे एक पर्यवेक्षकांचीही नियुक्ती झाली आहे. बीएलओच्या धर्तीवर राजकीय पक्षाला बीएलए नियुक्तीची मुभा राहणार आहे. जे प्रशासनाच्या बीएलओंना मदत करणार आहेत.

मतदार याद्यांबाबत अनेक आक्षेप असल्याने ती दुरुस्त करण्याच्या दृष्टीने हे एसआयआरमहत्वपूर्ण ठरणार आहे. एप्रिलपासून याला सुरुवात होणाऱ्याची शक्यता आहे. प्रत्येक मतदारासाठी एक फॉर्म प्रिन्ट केला जाणार असून त्याला युनिक कोड दिला जाणार आहे. हे फॉर्म दोन प्रतीमध्ये बीएलओ घरोघरी जाऊन मतदारांना देणार आहेत. या फॉर्ममध्ये माहिती भरून ती बीएलओंना द्यावी लागणार आहे. त्यानंतर बीएलओऑनलाईन पद्धतीने ती माहिती भरणार आहेत. त्यावेळी २००२ मध्ये झालेल्या एसआरआरसोबत या माहितीचे मॅपींग केले जाणार आहे.

मॅपींग योग्य असल्यास मतदान अधिकारी त्याला मंजुरी देणार आहेत. त्यानंतर प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

काही आक्षेप असल्यास त्याच्यावर अपील करता येणार आहे. आपीलांवर सुनावणी घेतल्यानंतर अंतीम मतदार यादी प्रसिद्ध होणार असल्याचे जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande