दर्यापूरमध्ये महसूल पथकावर हल्ला, 5 जणांविरुद्ध गुन्हा
अमरावती, 18 मार्च (हिं.स.) । दर्यापूर येथे महसूल पथकावर हल्ला करून शासकीय कामात अडथळा महसूल पथकावर हल्ला, 5 जणांविरुद्ध गुन्हा दर्यापूरमध्ये शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी कारवाईनिर्माण केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महसूल पथकावर हल्ला, 5 जणांविरुद्ध गुन्हा दर्यापूरमध्ये शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी कारवाई


अमरावती, 18 मार्च (हिं.स.) । दर्यापूर येथे महसूल पथकावर हल्ला करून शासकीय कामात अडथळा महसूल पथकावर हल्ला, 5 जणांविरुद्ध गुन्हा

दर्यापूरमध्ये शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी कारवाईनिर्माण केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी दर्यापूर-अंजनगाव सुर्जी टी-पॉईंट परिसरात घरगुती गॅस सिलिंडर जप्त करण्याच्या कारवाईदरम्यान हा प्रकार घडला.

जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या आदेशानुसार, रविवारी दर्यापूर शहरात महसूल पथकाने 9 हॉटेलची तपासणी केली. या तपासणीत घरगुती सिलिंडरचा गैरवापर करून हॉटेल चालवले जात असल्याचे आढळून आले. पथकाने यावेळी १५ सिलिंडर जप्त केले.ही कारवाई सुरू असताना हॉटेल जमजमचे संचालक आणि त्यांच्यासोबतच्या काही लोकांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांशी वाद घातला. त्यांनी पथकातील सदस्यांना धक्काबुक्की केली आणि पंचनाम्याची कागदपत्रे फाडून शासकीय कामात अडथळा निर्माण केला.

या प्रकरणी रात्री उशिरा निवासी नायब तहसीलदार प्रमोद काळे यांच्या तक्रारीवरून दर्यापूर शहर पोलिसांनी 5 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. शुभम दादाराव पारवे, मोहम्मद जुनेद अब्दुल रऊफ, मोहम्मद इम्रान अब्दुल अमीन, दादाराव पारवे आणि अब्दुल अमीन अब्दुल मोबीन (सर्व रा. दर्यापूर) अशी आरोपींची नावे आहेत.या पाचही जणांवर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार सुनील वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande