बीड - घरकुल लाभार्थींना एक लाख रुपये प्रति घरकुल प्रमाणे पहिल्या हप्त्याचे वितरण
बीड, 19 मार्च, (हिं.स.)। गुढी पाडव्याच्या शुभदिनी परळी नगर परिषद अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना 2.0 च्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या 677 घरकुल लाभार्थींना एक लाख रुपये प्रति घरकुल प्रमाणे पहिल्या हप्त्याचे वितरण आमदार धनंजय मुंडे यांच्या हस्
अ


बीड, 19 मार्च, (हिं.स.)। गुढी पाडव्याच्या शुभदिनी परळी नगर परिषद अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना 2.0 च्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या 677 घरकुल लाभार्थींना एक लाख रुपये प्रति घरकुल प्रमाणे पहिल्या हप्त्याचे वितरण आमदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

रमाई आवास योजनेतून आणखी 200 घरकुले मंजूर करण्यात आली असून त्याचे प्रस्ताव व अन्य बाबी तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी दिल्या. त्याचबरोबर 5% निधीतून दिव्यांग बांधवांना देण्यात येणाऱ्या आर्थिक लाभाचेही वितरण करण्यात आले.

आमदार मुंडे यांनी सांगितले की, नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषद निवडणुकीत परळीकरांनी भरघोस मतांनी महायुतीला विजय मिळवून दिला. घरकुल सह वैयक्तिक लाभाच्या योजना आणि सार्वजनिक हिताच्या विकास कामात दुप्पट संख्येने आणि दुप्पट वेगाने काम करत राहू, असा शब्द यावेळी दिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande