लोकजागर मंचच्या वतीने आयोजित ‘माझी गुढी’ स्पर्धेला मोठा प्रतिसाद
अकोला, 19 मार्च (हिं.स.)। जिल्ह्यात सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवणाऱ्या लोकजागर मंचच्या वतीने यंदा गुढीपाडव्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या ‘माझी गुढी’ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी आणि पारंप
Photo


अकोला, 19 मार्च (हिं.स.)।

जिल्ह्यात सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवणाऱ्या लोकजागर मंचच्या वतीने यंदा गुढीपाडव्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या ‘माझी गुढी’ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी आणि पारंपरिक संस्कृती जपण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

दरवर्षी विविध उपक्रम राबवणाऱ्या लोकजागर मंचच्या या उपक्रमात यंदा तेल्हारा आणि अकोट तालुक्यातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.पारंपरिक पद्धतीने उभारलेल्या गुढ्यांसोबतच विविध आकर्षक सजावटीमुळे स्पर्धेला वेगळाच उत्साह लाभला.विशेष म्हणजे खापरखेड येथील जिल्हा परिषद शाळेनेही या स्पर्धेत सहभाग घेत विद्यार्थ्यांच्या मदतीने आकर्षक गुढी उभारली. विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, अक्षरांची ओळख व्हावी आणि परंपरेची जाणीव व्हावी या उद्देशाने ही गुढी विशेष सजवण्यात आली होती.यावेळी लोकजागर मंचचे संस्थापक अध्यक्ष अनिल गावंडे यांनी शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांनी सजवलेल्या गुढीची पाहणी केली आणि त्यांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.

गुढीपाडव्याच्या निमित्ताने पारंपरिक संस्कृती जपण्याचा संदेश देणाऱ्या या ‘माझी गुढी’ स्पर्धेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande