अवकाळी पावसाचा रेल्वेच्या हाईट गेजला फटका; कोटमगाव येथे अपघात टळला
लासलगाव, 19 मार्च, (हिं.स.)। निफाड तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका आता रेल्वे सुविधांनाही बसल्याचे समोर आले आहे. कोटमगाव येथील रेल्वे पुलासमोर बसविण्यात आलेले सुरक्षा हाईट गेज जमिनीत ओलावा निर्माण झाल्यामुळे तिरपे झाल्याची घटना घडली. घटनेची
अवकाळी पावसाचा रेल्वेच्या हाईट गेजला फटका; कोटमगाव येथे अपघात टळला


लासलगाव, 19 मार्च, (हिं.स.)। निफाड तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका आता रेल्वे सुविधांनाही बसल्याचे समोर आले आहे. कोटमगाव येथील रेल्वे पुलासमोर बसविण्यात आलेले सुरक्षा हाईट गेज जमिनीत ओलावा निर्माण झाल्यामुळे तिरपे झाल्याची घटना घडली.

घटनेची माहिती मिळताच रेल्वेच्या ठेकेदारांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत दुरुस्तीचे काम सुरू केले. ट्रॅक्टरच्या सहाय्याने तिरपे झालेले लोखंडी हाईट गेज सुरक्षितपणे काढण्याचे काम सुरू असताना ते जवळ उभ्या असलेल्या मजुरांवर कोसळण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र मजुरांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, दुरुस्तीचे काम सुरू असल्याने काही काळ परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande