महिला आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा - संभाजी राजे छत्रपती
नाशिक, 19 मार्च (हिं.स.)। -महाराष्ट्र हा राजमाता जिजाऊ आणि ताराराणी यांच्या परंपरेचा अभिमान बाळगणारा राज्य आहे. अशा राज्यात महिलांवर अत्याचाराच्या घटना घडत असताना, संबंधित आरोपींचे समर्थन होत असल्याची भावना निर्माण होणे अत्यंत दुर्दैवी आहे. महिला
Women's Commission Chairperson


नाशिक, 19 मार्च (हिं.स.)।

-महाराष्ट्र हा राजमाता जिजाऊ आणि ताराराणी यांच्या परंपरेचा अभिमान बाळगणारा राज्य आहे. अशा राज्यात महिलांवर अत्याचाराच्या घटना घडत असताना, संबंधित आरोपींचे समर्थन होत असल्याची भावना निर्माण होणे अत्यंत दुर्दैवी आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर या संदर्भात टीका होत असून, त्यांनी आपल्या पदाची नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा द्यावा, अशी मागणी होत आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन योग्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा स्वराज्य पक्ष प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली

नाशिकच्या अतिप्राचीन ग्रामदैवत कालिका मंदिरात झालेल्या स्वराज्य पक्षाच्या बैठकीप्रसंगी ते बोलत होते मराठी नववर्षाच्या शुभमुहूर्तावर स्वराज्य संघटनेने नव्या जोमाने आणि कालीका मातेच्या आशीर्वादाने आपल्या पुढील वाटचालीची सुरुवात केली. यावेळी छत्रपती संभाजी महाराज नाशिक दौर्यावर आले असता कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आणि ऊर्जा पाहायला मिळाली.

यादरम्यान कालीका मंदिरात छत्रपती संभाजी महाराज यांच्या हस्ते आरती करण्यात आली. त्यानंतर मंदिर ट्रस्टच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. पुढे झालेल्या बैठकीत स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

या बैठकीत संघटनेला नवसंजीवनी देण्यासाठी आणि कार्यात अधिक जोमाने पुढे जाण्यासाठी ठोस निर्णय घेण्यात आले. विशेषतः, जे कार्यकर्ते इतर पक्षांमध्ये कार्यरत आहेत, त्यांना पदमुक्त करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

या बैठकीनंतर कार्यकर्त्यांनी पुन्हा नव्याने ऊर्जा मिळाल्याचे स्पष्टपणे सांगितले. यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या भाषणात सध्याच्या गोंधळलेल्या राजकीय परिस्थितीत युवकांसाठी स्वच्छ आणि सकारात्मक राजकारणाचे व्यासपीठ म्हणजे स्वराज्य संघटना असल्याचे अधोरेखित केले.

या कार्यक्रमास स्वराज्य संघटनेचे जिल्हाप्रमुख डॉ. रुपेश नाठे पाटील, उत्तर महाराष्ट्र प्रमुख केशव गोसावी, सचिव ज्ञानेश्वर थोरात, शेतकरी आघाडीचे प्रशांत डिक्कर, महानगर प्रमुख रोशन खैरे, युवक जिल्हाप्रमुख नितीन पाटील यांच्यासह सागर पवार, संदीप अवारे, ललित उशीर, संतोष मिंदे, रेखा जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande