ठाणे - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब केली देवीची पूजा
सर्वांना सुख, शांती मिळावी यासाठी देवीकडे केली प्रार्थना ठाणे, 19 मार्च (हिं.स.)। चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे पूर्व येथील श्री जय अंबे माता मंडळाच्या देवीचे सहकुटुंब विधिवत
*सर्वांना सुख, शांती मिळावी यासाठी देवीकडे केली प्रार्थना*


सर्वांना सुख, शांती मिळावी यासाठी देवीकडे केली प्रार्थना

ठाणे, 19 मार्च (हिं.स.)। चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे पूर्व येथील श्री जय अंबे माता मंडळाच्या देवीचे सहकुटुंब विधिवत पूजन करून देवीची विधिवत प्राणप्रतिष्ठा केली.

ठाणे पूर्व येथील संत तुकाराम महाराज मैदानात चैत्र नवरात्रोत्सवानिमित्त या देवीची स्थापना करण्यात आली असून पुढील नऊ दिवस इथे वेगवेगळ्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

यावेळी शिंदे कुटुंबियांनी विधीप्रमाणे देवीचे पाद्यपूजन करून तिच्यावर पुष्प आणि कुमकुम वाहून तिची प्रथेप्रमाणे पूजा करून आरती केली. देवीच्या आशीर्वादाने सर्वांना सुख,शांती, भरभराट, आनंद मिळावा तसेच सर्वांच्या दुःखाचे हरण व्हावे अशी मनोकामना देवीच्या चरणी लीन होताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी शिंदे यांचा मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, पत्नी सौ. लता शिंदे, सून सौ. वृषाली श्रीकांत शिंदे आणि नातू रुद्रांश तसेच शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande