किरण महल्ले यांची राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती
अमरावती, १९ मार्च (हिं.स.) । अमरावतीच्या माजी महापौर आणि भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नेत्या किरणताई महल्ले यांची राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कार्यालयातर्फे मंगळवार, १७ मार्च
माजी महापौर किरणताई महल्ले राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या सदस्य राष्ट्रपतींकडून अधिसूचना जारी


अमरावती, १९ मार्च (हिं.स.) । अमरावतीच्या माजी महापौर आणि भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नेत्या किरणताई महल्ले यांची राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कार्यालयातर्फे मंगळवार, १७ मार्च रोजी यासंदर्भातील अधिसूचना जारी करण्यात आली.

महल्ले यांनी १९९७ साली अमरावतीच्या महापौर म्हणून कार्यभार सांभाळला होता. त्याआधी त्यांच्या नेतृत्वाखाली राधानगर परिसरातील मद्यविक्रीचे दुकान हटवण्यासाठी महत्त्वपूर्ण आंदोलन उभारण्यात आले होते. तसेच, त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीसपदाची जबाबदारीही यशस्वीपणे पार पाडली आहे. सध्या त्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये अग्रस्थानी मानल्या जातात.

दरम्यान, त्यांच्या या नियुक्तीबद्दल भाजपसह विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

विशेष म्हणजे, १९ मार्च हा किरणताई महल्ले यांचा वाढदिवस असून, १९९७ मध्ये याच दिवशी त्यांनी महापौरपदाची सूत्रे स्वीकारली होती. आता पुन्हा याच दिवशी त्यांची राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती झाल्याने ही तारीख त्यांच्यासाठी विशेष आणि भाग्यशाली ठरली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande