
लातूर, 19 मार्च (हिं.स.)। लातूरच्या गंजगोलाईतील जगदंबा मंदिरासमोर आज गुढी पाडव्याच्या दिवशी परंपरेप्रमाणे प्रथम मानाच्या सार्वजनिक गुढी चे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून गोलाई भोवती गुढीची मिरवणूक काढत मंदिरासमोर सार्वजनिक गुढी उभारण्यात आली. यावेळी सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
लातूरच्या प्रथम नागरिक महापौर सौ. जयश्री सोनकांबळे, पोलिस अधिक्षक अमोल तांबे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी राहूलकुमार मीना, मनपा आयुक्त सौ. मानसी मीना, मनपा क्षेत्रीय अधिकारी समाधान सुर्यवंशी, नगरसेवक गिरीश ब्याळे, गणेश गवारे, सौ. मंजूलता अग्रवाल, यांच्या हस्ते प्रथम मानाच्या सार्वजनिक गुढीचे पूजन करण्यात आले.
यावेळी संस्थापक अध्यक्ष पंकज जैस्वाल, यंदाच्या महोत्सवाचे,स्वागताध्यक्ष अमोल गिते, अप्पू भरडे, बालाजी गवळी, विष्णू भुतडा, नितिन पडिले, रामभाऊ जवळगे, नवनाथ भोसले, बालाजी पारसेवार, विद्याताई काळे, डी.व्ही. काळे, प्रभाकर चव्हाण, वामन पाठक, रवि जाधव, संदीप येरावार, सचिन गांगले आदिंनी केले.
जगदंबा मंदिरातील देवीची अभिषेक पूजा विश्वस्त शिवशंकर पारशेट्टी दाम्पत्य, काळे दाम्पत्यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी नारायण भूतडा, किशोर जैन, प्रभाकर शिरूरे, काकासाहेब घुटे, प्रकाश शिंदे, दिनेश कबाडे आदिंचीही उपस्थिती होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis