अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांनी दिला राजीनामा
मुंबई, २० मार्च (हिं.स.) : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचे प्रकरणात संबंध असल्याच्या कारणावरून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सदर प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याचे आदेश दिले. त्यानंतर चाक
चाकणकर राजीनामा


चाकणकर राजीनामा पत्र


मुंबई, २० मार्च (हिं.स.) : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचे प्रकरणात संबंध असल्याच्या कारणावरून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सदर प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याचे आदेश दिले. त्यानंतर चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला.

शेकडो महिलांच्या लैंगिक शोषणाचा आरोप असलेला भोंदूबाबा अशोक खरात सोबत रुपाली चाकणकरांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यानंतर विरोधकांकडून चाकणकरांवर टीका आणि राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली होती. या पार्श्वभूमीवर संध्याकाळी उशिरा चाकणकर यांनी राजीनामा द्यावा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेत राजीनामा दिला आहे.

रुपाली चाकणकर यांनी राजीनामा पत्रात म्हटले की, मी, सौ. रुपाली निलेश चाकणकर, वरील विषयान्वये आपणांस विनंतीपूर्वक कळवू इच्छिते की, दि. 15 ऑक्टोबर 2024 रोजी माझी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची अध्यक्षा म्हणून नियुक्ती झाली होती. माझ्या वैयक्तिक कारणाने मी स्वेच्छेने सदर पदाचा राजीनामा ह्या पत्राद्वारे आपणांस सादर करत आहे.

आजवर माझ्यावर विश्वास दाखवून आपण मला सर्वतोपरी सहकार्य केले त्याबद्दल मी आपली व सर्व सहकाऱ्यांची शतशः ऋणी आहे. भविष्यातही आपले असेच सहकार्य राहील असा मला विश्वास आहे. तरी आपण माझा अध्यक्षा, राज्य महिला आयोग ह्या पदाचा राजीनामा स्वीकारावा अशी आपणांस नम्र विनंती आहे.

तसेच चाकणकर यांनी राजीनामा देण्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेत त्यांना अशोक खरात महिला अत्याचार प्रकरणाचा सखोल व वस्तुनिष्ठ तपास व्हावा, तसेच या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करत या प्रकरणातील सत्यता बाहेर यावी व आरोपीवर कठोर कारवाई व्हावी, याबाबत पत्र दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande