
नाशिक, 21 मार्च, (हिं.स.)। अस्मिता राज्यस्तरीय पिंच्याक सिलॅट लीग महाराष्ट्र या स्पर्धेचे आयोजन स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया साई च्या मान्यतेने व इंडियन पिंच्याक सिलॅट फेडरेशनच्या मार्गदर्शनाने महाराष्ट्र पिंच्याक सिलॅट असोशियन ने सर्वेश्वर महादेव ट्रस्टच्या इनडोअर हॉल तपोवन नाशिक येथे २१ ते २२ मार्च २०२६ रोजी सर्व वयोगटातील महिला खेळाडूंसाठी केले होते.
या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यातील ८०० महिला खेळाडू सहभागी झाल्या आहेत. स्पर्धेचा उद्घाटन समारंभ २१ मार्च रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला होता.या उद्घाटनप्रसंगी नाशिक महानगर पालिकेचे उपमहापौर विलास अण्णा शिंदे ,इंडियन पिंच्याक सिल्याट फेडरेशन राष्ट्रीय अध्यक्ष किशोर येवले , सुवर्णा मटाले- नगरसेविका, फॉरेस्ट राऊंड ऑफिसर राहुल वाघ,संदीप फाऊंडेशनचे दुबे सर ,अविनाश भाऊ शिंदे - समाजसेवक, अस्मिता देशमाने - जिल्हा प्रमुख महिला आघाडी, मंगला भास्कर - जिल्हा प्रमुख ग्रामीण महिला आघाडी, संजय भामरे - समाजसेवक ,धनंजय सोनवणे ऍडव्होकेट आदी मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. दीपप्रज्वलन व शिवप्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. व राष्ट्रगीताने कार्यमाची सांगता करण्यात आली. केतन गुंजाळ, C.A. गाढवे सर, नागेश बनसोडे, नितीन वाघ, योगेश पानपाटील, आकाश धबडगे यांचे सहकार्य लाभले. महाराष्ट्र पिंच्याक सिल्याट चे पदाधिकारी सौ. पौर्णिमा तेली, तृप्ती बनसोडे, देखील उपस्थित होते.
या उद्घाटन समारंभास संबोधित करताना मा. उपमहापौर विलास अण्णा शिंदे यांनी नरेंद्रजी मोदी - पंतप्रधान, डॉ. मनसुख मांडविया - केंद्रीय क्रीडा मंत्री, रक्षा खडसे- केंद्रीय क्रीडा राज्य मंत्री यांनी नाशिक नगरी मध्ये या राज्य स्तरीय स्पर्धेचे आयोजन दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले व खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
मा. किशोर येवले - इंडियन पिंच्याक सिल्याट चे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी खेळाविषयी माहिती देऊन अस्मिता पिंच्याक सिल्याट लीग स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया ( SAI) ने भारतातील सर्व खेळाडूंना सिटी लीग, स्टेट लीग, झोनल लीग, व नॅशनल लीग या स्पर्धा मुलींसाठी उपलब्ध करून दिल्यामुळे आम्ही पिंच्याक सिल्याट च्या पूर्ण देशांमध्ये 100 सिटीली घेऊ शकलो. त्यामुळे देशातील हजारो मुली या स्पर्धांमध्ये सहभागी होऊ शकल्या व खेळाडूंना झोनल लीगसाठी अनुक्रमे 8000 रु, 6000 रु, व 4000 रु तसेच राष्ट्रीय लीग साठी 10,000 रु, 8000 रु व 6000 रु ही स्कॉलरशिप थेट खेळाडूंच्या अकाउंटला स्पोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया (SAI) ने दिल्यामुळे त्यांचे आभार अध्यक्षांनी व्यक्त केले व पिंच्याक सिल्याट च्या हजारो खेळाडूना विविध खात्यातून नोकऱ्या मिळतात त्यामुळे पिंच्याक सिल्याट या खेळात खेळाडूंचे उज्वल भविष्य या खेळात घडते त्यासाठी महाराष्ट्रातील जास्तीत जास्त युवकांनी या खेळात सहभागी होण्याचे आव्हान त्यांनी केले व स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV