रत्नागिरी : क्षत्रिय मराठा प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
रत्नागिरी, 21 मार्च, (हिं. स.) : येथील क्षत्रिय मराठा मंडळाने आयोजित केलेली क्षत्रिय मराठा प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा आजपासून सुरू झाली. शांतीनगर येथील शिवरुद्र टर्फ येथे नेरूळ (नवी मुंबई) येथील डी. वाय. पाटील क्रिकेट अॅकॅडमीचे सचिव आणि मुंबई क्
क्षत्रिय मराठा प्रीमिअर लीग स्पर्धेचा प्रारंभ


रत्नागिरी, 21 मार्च, (हिं. स.) : येथील क्षत्रिय मराठा मंडळाने आयोजित केलेली क्षत्रिय मराठा प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा आजपासून सुरू झाली.

शांतीनगर येथील शिवरुद्र टर्फ येथे नेरूळ (नवी मुंबई) येथील डी. वाय. पाटील क्रिकेट अॅकॅडमीचे सचिव आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे प्रतिनिधी अविनाश गजानन साळवी यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. क्षत्रिय मराठा प्रीमियर लीगचे हे पहिलेच वर्ष असून पुरुषांचे २४ व महिलांचे ४ संघ असे २८ संघ या स्पर्धेत उतरले आहेत.

उद्घाटनप्रसंगी सौ. साळवी, क्षत्रिय मराठा मंडळाचे कार्याध्यक्ष राकेश नलावडे, प्रचारप्रमुख संतोष तावडे, उपाध्यक्ष प्राची शिंदे आदी उपस्थित होते. सर्वप्रथम २४ संघमालक व त्यांच्या क्रिकेट संघाच्या कप्तानाला बोलवून त्यांचे स्वागत श्री. साळवी यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन करण्यात आले. रत्नागिरी शहराजवळील सुमारे दहा गावांतील क्षत्रिय मराठा खेळाडूंना यात संधी मिळाली आहे. नाचणे, मिऱ्या, शिरगाव, टेंभ्ये, कसोप, कोळंबे, फणसोप, पाली, खेडशी, टिके, कासारवेली आदी गावातील आणि शहरी विभागातील संघ आहेत.

यावेळी अविनाश साळवी म्हणाले की, क्रिकेट प्रीमियर लीगचे उद्घाटन करण्याची संधी मला मिळाली. ५३ वर्षांपूर्वी मी रत्नागिरीला क्रिकेट खेळलो. त्यावेळी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मोहन शिर्के होते, विजय तथा अप्पा साळवी, जयसिंगराव चव्हाण असे कार्यकर्ते कार्यरत होते. त्या सर्वांनी मला जिल्ह्यासाठी खेळवले. माझ्यासोबत दीपक जाधव, अनंत सोलकर होते. आता मी अनेकांना प्रोत्साहन देत क्रिकेटसाठी काही काम करत आहे. सर्वजण क्रिकेटपटू होतील असे नाही, पण क्युरेटर, पंच, समालोचक, सहाय्यक होऊ शकतात. त्यामुळे अभ्यास करा, क्रिकेट खेळा, क्रिकेट खेळ तुम्हाला मान व धन मिळवून देईल.

स्पर्धेमध्ये पुरुष विजेत्या संघाला रोख २५ हजार, उपविजेत्या संघाला रोख १५ हजार रुपये असे पारितोषिक व मॅन ऑफ द सिरीज विजेत्याला इलेक्ट्रिक बाइक बक्षीस दिली जाणार आहे. महिला विजेता संघाला ७७७७, संघाला ५५५५ रुपये व चषक, वुमन ऑफ द सिरीज किताब विजेत्या महिलेला १५ हजार रुपयांची पैठणी देऊन सन्मान करण्यात येणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande