लातूर - जिद्द आणि चिकाटीतून यशाला गवसणी - डॉ. प्रितम भाले
लातूर, 21 मार्च (हिं.स.)। यशस्वी होण्याची जिद्द आणि चिकाटीमुळे यशाला गवसणी घालू शकलो, असे प्रतिपादन डॉ. प्रितमकुमार भाले यांनी व्यक्त केले. यूपीएससी परीक्षेमध्ये यश संपादन केल्याबद्दल लातूर येथे आयोजित सत्कार प्रसंगी ते बोलत होते. यावेळी नूतन नगरसे
प्रितम भाले


लातूर, 21 मार्च (हिं.स.)। यशस्वी होण्याची जिद्द आणि चिकाटीमुळे यशाला गवसणी घालू शकलो, असे प्रतिपादन डॉ. प्रितमकुमार भाले यांनी व्यक्त केले. यूपीएससी परीक्षेमध्ये यश संपादन केल्याबद्दल लातूर येथे आयोजित सत्कार प्रसंगी ते बोलत होते. यावेळी नूतन नगरसेवक भीमाशंकर बेंबळकर, नगरसेविका रागिणी यादव, बाबुराव भाले, धर्मेंद्र चौहान यांची प्रमुख उपस्थिती होती.

भारतीय लोकसेवा आयोग परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल विक्रम नगरातील श्रावस्ती बुद्ध विहार या ठिकाणी विक्रम नगर वासियांच्या वतीने डॉ. प्रितमकुमार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना डॉ. भाले म्हणाले की, बालपणापासून घरात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा, समाजा साठी कांहीतरी करण्याची इच्छा होती. ती उच्च शिक्षणाशिवाय पूर्ण करू शकत नाही, याची जाणीव झाली.घरातील वडीलधाऱ्या मंडळीच्या सहकार्याने शिक्षण घेऊन आज भारतीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकलो. यश मिळू शकते, त्यासाठी सातत्य आणि परिश्रम महत्वाचे आहे. मुलांनी वेळेचा अपव्यय टाळून आम्हाला भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या यशस्वी मार्गाचा अवलंब करावा. अशा भावना व्यक्त केल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande