नांदेड - ग्रामीण पोलिसांची वाळू घाटावर कारवाई; १ कोटी ६५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
नांदेड, 21 मार्च (हिं.स.)। नांदेड तालुक्यातील गोदावरी नदीतून अवैध वाळू उपसा करणारे पाच वाळू घाटावर ग्रामीण पोलिसांनी धाड टाकून ठिकाणी अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई करत १ कोटी ६५ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे
नांदेड - ग्रामीण पोलिसांची वाळू घाटावर कारवाई; १ कोटी ६५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त


नांदेड, 21 मार्च (हिं.स.)।

नांदेड तालुक्यातील गोदावरी नदीतून अवैध वाळू उपसा करणारे पाच वाळू घाटावर ग्रामीण पोलिसांनी धाड टाकून ठिकाणी अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई करत १ कोटी ६५ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सदर कारवाईत 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी अवैध वाळू उपसा करणारे साहित्य जिलेटीन स्फोटाने उदध्वस्त केले आहे.

नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर यांना गुप्त माहिती मिळाली की, त्यांच्या हद्दीतील पिंपळगाव निमजी, भनगी, वाहेगाव,

गंगाबेट या ठिकाणी अवैध वाळू उत्खनन करण्यात येत आहे. त्यावेळी पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अवैध वाळू उपसा करणारे या वाळू घाटावर कारवाई करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी घटनास्थळावरुन फायबर बोट, लोखंडी बोट, इंजिन तराफे, वाळू असा १ कोटी ६५ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी अवैध वाळू उपसा करणारे सर्व साहित्य जिलेटीन स्फोटाने उध्वस्त केले आहेत. पोलिस अधिक्षक अबिनाश कुमार, अप्पर पोलिस अधिक्षक सुरज गुरव, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर, पोलीस उप निरीक्षक व्यंकट कुसमे, पोलीस अंमलदार पंचलिंग, गवेंद्र सिरमलवार, शंकर माळगे, हनवता कदम, समीर, चावरे यांनी केली. अवैध वाळू उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande