रत्नागिरी : नांदगावजवळ ‘हॉटेल पिकनिक पॉइंट’ला मध्यरात्री आग
रत्नागिरी, 23 मार्च, (हिं. स.) : खेड तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील नांदगावजवळ असलेल्या हॉटेल पिकनिक पॉइंटला आज पहाटे आग लागली. या आगीत हॉटेल पूर्णपणे जळून खाक झाले असून सुमारे एक लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहित
रत्नागिरी : नांदगावजवळ ‘हॉटेल पिकनिक पॉइंट’ला मध्यरात्री आग


रत्नागिरी, 23 मार्च, (हिं. स.) : खेड तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील नांदगावजवळ असलेल्या हॉटेल पिकनिक पॉइंटला आज पहाटे आग लागली. या आगीत हॉटेल पूर्णपणे जळून खाक झाले असून सुमारे एक लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सामाजिक कार्यकर्ते जलाल राजपूरकर यांच्या मालकीचे हे हॉटेल असून रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास आग लागली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ माहिती दिली, मात्र तोपर्यंत आगीने विक्राळ रूप धारण केल्याने संपूर्ण हॉटेल भस्मसात झाले.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून आग लागण्यामागील कारणाबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. संबंधित मालकांनी ही आग जाणीवपूर्वक लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला आहे.काही महिन्यांपूर्वी याच ठिकाणी अवैधरीत्या प्रवेश करून मद्यप्राशन करणाऱ्यांना पकडल्याची घटना घडली होती. त्यावेळी संबंधितांकडून धमकी व मारहाणीचा प्रयत्नही झाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे या आगीचा त्या घटनेशी संबंध असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

--------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande