चांदूर बाजारात भोंदू बाबा योसेफ विरोधात महिलांची पोलिसात तक्रार
अमरावती, 24 मार्च (हिं.स.) : चांदूर बाजारात महिलांनी भोंदू बाबा म्हणून ओळख होणाऱ्या योसेफ पंजाबराव मोरे यांच्या विरोधात पोलिसांकडे धडक देऊन तक्रार दाखल केली आहे. महिलांचा आरोप आहे की, योसेफ चर्च चालवत आदिवासी व इतर नागरिकांची फसवणूक करून धर्मांतर घ
चांदूर बाजारात भोंदू बाबाचा धुमाकूळ  चांदूर बाजार पोलीस स्टेशन मध्ये महिलांची धडक, तक्रार दाखल


अमरावती, 24 मार्च (हिं.स.) : चांदूर बाजारात महिलांनी भोंदू बाबा म्हणून ओळख होणाऱ्या योसेफ पंजाबराव मोरे यांच्या विरोधात पोलिसांकडे धडक देऊन तक्रार दाखल केली आहे. महिलांचा आरोप आहे की, योसेफ चर्च चालवत आदिवासी व इतर नागरिकांची फसवणूक करून धर्मांतर घडवतो.

माहितीनुसार, योसेफ स्वतःला बाबा म्हणून ओळख करून लोकांच्या कौटुंबिक, आर्थिक व आरोग्याच्या समस्यांवर मंत्रतंत्र करून दूर करण्याचे आश्वासन देतो. या प्रक्रियेत तो नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेत असल्याचा आरोप महिलांनी केला आहे. तसेच, मुल होत नसलेल्या स्त्रीयांना भविष्यवाणी करून मोठ्या रकमेची मागणी करणे, भीतीचे वातावरण निर्माण करून लोकांना आपल्या जाळ्यात ओढणे, असे गंभीर प्रकार घडवत असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

या प्रकरणी चांदूर बाजारातील सर्व महिलांनी एकत्र येऊन पोलिस निरीक्षक अशोक जाधव यांना निवेदन दिले असून संबंधितावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत तपास सुरू केला आहे.

महिला आघाडीच्या संगीता जवंजाळ यांनी नागरिकांना सावध राहण्याचे आणि अंधश्रद्धा व फसवणुकीपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. चांदूर बाजारात भोंदू बाबांसारख्या फसवणूक करणाऱ्या व्यक्तींपासून लोकांनी सतर्क राहावे, असे सांगण्यात आले आहे.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande