अमरावतीत प्लॉट खरेदीच्या नावाखाली ३८.७ लाख रुपयांची फसवणूक; दोघांविरुद्ध गुन्हा
अमरावती, 24 मार्च (हिं.स.) : प्लॉट खरेदीच्या व्यवहारात जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून अभिजित विनायक गुल्हाने (वय ३२, श्रीहरी विहार, अमरावती) यांना ३८ लाख ७० हजार रुपयांनी फसवले गेले. ही घटना राजापेठ ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. श्री. गुल्हान
प्लॉट खरेदीमध्ये ३८ लाख ७० हजारांनी युवकाची फसवणूक


अमरावती, 24 मार्च (हिं.स.) : प्लॉट खरेदीच्या व्यवहारात जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून अभिजित विनायक गुल्हाने (वय ३२, श्रीहरी विहार, अमरावती) यांना ३८ लाख ७० हजार रुपयांनी फसवले गेले. ही घटना राजापेठ ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

श्री. गुल्हाने यांच्या तक्रारीवरून संशयित संतोष रामकृष्ण दहीकर (वय ५६) आणि ऋत्विक संतोष दहीकर (वय २१, दोघेही रा. अकोली रोड, साईकृपा, अमरावती) यांच्या विरोधात राजापेठ ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

संतोष व ऋत्विक दहीकर हे दोघेही श्री. गुल्हाने यांचे परिचित असून, त्यांनी अभिजित गुल्हाने यांच्या वडिलांना प्लॉट खरेदी-विक्रीचा व्यवसाय करून जास्त नफा कमविण्याचे आमिष दाखवले. २६ नोव्हेंबर २०२० ते १४ सप्टेंबर २०२१ या कालावधीत रोख रक्कम व धनादेशाद्वारे दोघांनी एकूण ३८ लाख ७० हजार रुपये घेतले, परंतु कोणताही आर्थिक लाभ दिला नाही.

अभिजित गुल्हाने यांनी पैसे परत मागितले असता संशयितांनी टाळाटाळ केली. तक्रारीच्या आधारे दोघांविरुद्ध राजापेठ ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.-----------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande