
छत्रपती संभाजीनगर, 23 मार्च (हिं.स.) : छत्रपती संभाजीनगर शहरात गॅस टंचाई तीव्र झाल्याने रिक्षाचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रवासी रिक्षांमध्ये गॅस संपल्याने अनेकांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यामुळे गॅस भरण्यासाठी चालकांनी पहाटेपासूनच पेट्रोल पंपांवर गर्दी केली असून लांबच लांब रांगा लागल्या आहेत. गॅस उपलब्ध होत नसल्याने रोजीरोटीवर परिणाम होत असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी रिक्षाचालकांकडून केली जात आहे. छत्रपती संभाजी नगर शहरात गॅस टंचाईमुळे मोठ्या प्रमाणात रिक्षाची दरवाढ होऊ शकते
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis