छ. संभाजीनगर : सालगडी लावण्यासाठी शेतकऱ्यांची धावाधाव
छत्रपती संभाजीनगर, 24 मार्च (हिं.स.)। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांच्या नववर्षास सुरू होते. मात्र, यंदा गुढीपाडवा होऊन पाच दिवस झाले तरी शेतामध्ये वर्षभर काम करण्यासाठी सालगडी लावण्यासाठी शेतकऱ्यांची धावाधाव होताना दिसून येत आहे. दिवसेंदिवस
छ. संभाजीनगर : सालगडी लावण्यासाठी शेतकऱ्यांची धावाधाव


छत्रपती संभाजीनगर, 24 मार्च (हिं.स.)। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांच्या नववर्षास सुरू होते. मात्र, यंदा गुढीपाडवा होऊन पाच दिवस झाले तरी शेतामध्ये वर्षभर काम करण्यासाठी सालगडी लावण्यासाठी शेतकऱ्यांची धावाधाव होताना दिसून येत आहे. दिवसेंदिवस सालगडी मिळत नसल्याने शेतकरी बटाईने किंवा हिश्श्याने शेती देत आहे. सालगडी मिळत नसल्याने जिल्हा बाहेरून तसेच परराज्यातून सालगडी आणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

या आधुनिक काळामध्ये शेतकरी यंत्राच्या साह्याने अनेक कामे करत असले तरी सालगड्याचे महत्त्व तितके दिसून येत आहे. गुढीपाडवा झाल्यापासून शेतकरी सालगड्याच्या शोधात आहे. तर काही शेतकरी आता जुन्या सालगड्यांची मनधरणी करीत आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे पंधरा एकरांपेक्षा जास्त शेती आहे अशा शेतकऱ्यांना सालगडी लागतो.त्यासाठी शेतकरी गावोगावी फिरत आहेत. तरीही सालगडी मिळत नसल्याने मध्यप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा राज्यात त्यांना जावे लागत आहे. सालगड्याला वार्षिक एक ते दीड लाख रुपये पगार देण्यास तयारी असूनही अनेकांना सालगडी मिळत नसल्याचे दिसून येत आहे. नवीन सालगडी मिळत नसल्यामुळे सध्या कामावर असलेल्या सालगड्याची मनधरणी करून त्यालाच पगार वाढ देऊन पुन्हा कामावर ठेवण्याची कसरत सुरु आहे. काही शेतकऱ्यांना सालगडी मिळाले असले तरी त्यांच्या अपेक्षा अधिक असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मोठी अडचण झाली असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. गुढी पाडवा होऊन दिवसा लोटले तरी शेतकऱ्यांची सालगड्यासाठी धावपळ सुरूच असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande