पुन्हा होणार गारपीट; २९ मार्चपर्यंत शेतीकामे पूर्ण करा - पंजाबराव डख
छत्रपती संभाजीनगर, 24 मार्च (हिं.स.)। काही दिवसांपूर्वी गारपिट झाली, आता पुन्हा ३० मार्च ते २ एप्रिल दरम्यान गारपिट होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी २९ मार्चपर्यंत शेतातील पीक काढणीसाठी इतर महत्वाचे कामे आटोपून घ्यावीत, असा सल्ला हवामान अभ्यासक
पुन्हा होणार गारपीट; २९ मार्चपर्यंत शेतीकामे पूर्ण करा - पंजाबराव डख


छत्रपती संभाजीनगर, 24 मार्च (हिं.स.)। काही दिवसांपूर्वी गारपिट झाली, आता पुन्हा ३० मार्च ते २ एप्रिल दरम्यान गारपिट होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी २९ मार्चपर्यंत शेतातील पीक काढणीसाठी इतर महत्वाचे कामे आटोपून घ्यावीत, असा सल्ला हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिला.

दरम्यान यंदा पाऊस कमी पडणार असून पिके मात्र चांगली येणार असल्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे. हवामान अभ्यासक डख एका शाळेत वार्षिक स्नेहसंमेलनासाठी आले असता त्यांनी छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील घाटाच्या माथ्यावर असलेल्या एका हॉटेलवर भेट दिली. त्या मराठवाड्याच्या काही भागात पुन्हा पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला आहे अलीकडेच मराठवाड्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाने थैमान घातले मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले.

-------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande