पत्रकार दीपक भागवत यांना चिपळूणमध्ये मारहाण
रत्नागिरी, 25 मार्च, (हिं. स.) : चिपळूणमध्ये आज पत्रकार दीपक भागवत यांच्यावर हल्ला करण्यात आला. चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेविरोधात सुरू असलेल्या उपोषणाचे वार्तांकन करायला गेलो असताना, पतसंस्थेशी संबंधित व्यक्तींनी आपल्याला शिविगाळ करून बेदम मारहा
पत्रकार दीपक भागवत यांना चिपळूणमध्ये मारहाण


रत्नागिरी, 25 मार्च, (हिं. स.) : चिपळूणमध्ये आज पत्रकार दीपक भागवत यांच्यावर हल्ला करण्यात आला.

चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेविरोधात सुरू असलेल्या उपोषणाचे वार्तांकन करायला गेलो असताना, पतसंस्थेशी संबंधित व्यक्तींनी आपल्याला शिविगाळ करून बेदम मारहाण केल्याचे श्री. भागवत यांनी व्हिडीओद्वारे सांगितले आहे.

दरम्यान, भर दिवसा चिपळूण शहराच्या गजबजलेल्या बहादूरशेख नाका परिसरात मारहाणीची घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. भागवत यांच्यावर कामथे येथे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून, पोलिसांकडून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी सांगितले.

लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर झालेला हा हल्ला निषेधार्ह असल्याची भावना विविध पत्रकार संघटनांनी व्यक्त केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande