अहमदपूरमध्ये मटका व ऑनलाईन जुगाराविरोधात पोलिसांची कारवाई; 3 आरोपींवर गुन्हे
लातूर, 25 मार्च (हिं.स.): अहमदपूर शहरात मटका व ऑनलाईन लॉटरी जुगार चालविणाऱ्यांविरोधात पोलिसांनी विशेष कारवाई करत तीन ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत तीन आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून एकूण ₹1,05,560/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अहमदपूर पोलीस

पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. भाजी मार्केट, मारोती मंदिर परिसर आणि मटन मार्केट परिसरात सलग धाड टाकण्यात आली. या वेळी आरोपी मोबाईल व संगणकाच्या माध्यमातून जुगार चालवत असल्याचे उघड झाले.

या कारवाईत सुरज हिरालाल राउत्रे (रा. अहमदपूर), गोपीचंद राजकुमार भगत (रा. अहमदपूर) आणि सुनिल रामराव गायकवाड (मुळ रा. परभणी, सध्या अहमदपूर) यांना ताब्यात घेण्यात आले.भाजी मार्केट परिसरातून ₹25,000/- किमतीचा मोबाईल व रोख रक्कम, एका कॉम्प्लेक्समधून ₹53,830/- किमतीचे संगणक साहित्य व रोख रक्कम, तसेच मटन मार्केट परिसरातून ₹26,730/- किमतीचा एलईडी टीव्ही, संगणक साहित्य व रोख रक्कम जप्त करण्यात आली.सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12 (अ) तसेच महाराष्ट्र राज्य लॉटरी अधिनियम कलम 4 (अ) (ग) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक आयुब शेख यांच्या पथकाने पार पाडली असून पुढील तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis

 rajesh pande