नाशिकमध्ये २७ ते २९ मार्च २२ व्या राष्ट्रीय जम्प-रोप अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन
नाशिक, 25 मार्च (हिं.स.)। - नाशिक जिल्हा जम्प-रोप असोसिएशन, महाराष्ट्र जम्प-रोप असोसिएशन यांच्या वतीने आणि डी. एस.एफ., नाशिक यांच्या सहकार्याने नाशिकमध्ये २७ ते २९ मार्च, २०२६ दरम्यान वरिष्ठ गटाच्या २२ व्या राष्ट्रीय जम्प-रोप अजिंक्यपद स्पर्धेचे
नाशिकमध्ये २७ ते २९ मार्च २२ व्या राष्ट्रीय जम्प-रोप अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन


नाशिक, 25 मार्च (हिं.स.)।

- नाशिक जिल्हा जम्प-रोप असोसिएशन, महाराष्ट्र जम्प-रोप असोसिएशन यांच्या वतीने आणि डी. एस.एफ., नाशिक यांच्या सहकार्याने नाशिकमध्ये २७ ते २९ मार्च, २०२६ दरम्यान वरिष्ठ गटाच्या २२ व्या राष्ट्रीय जम्प-रोप अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिकचे जेष्ठ क्रीडा संघटक तथा विविध संस्थांचे संचालक चंद्रशेखर सिंग यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या राष्ट्रीय जम्प रोप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिकच्या हिरावाडी, पंचवटी येथील विभागीय क्रीडा संकुल येथे दिनांक २७ ते २९ मार्च दरम्यान या स्पर्धा पार पडणार आहेत. चंद्रशेखर सिंग हे नाशिक जिल्हा ऑल गेम्स असोसिएशनचे उपाध्यक्ष असून नाशिकमध्ये आयोजित विविध क्रीडा उपक्रमानांच्या आयोजनामध्ये त्यांचे मोलाचे योगदान असते. याचप्रमाणे हिमींग शिपिंग कॉर्पोरेशन प्रा. लि. कंपनीचे संचालक, पोस्ट डेव्हलोपमेंट अँड लॉजिस्टिक्सचे चेअरमन, महाराष्ट्र चेम्बर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अग्रीकल्चर संस्थेचे संचालक, कस्टोडियन कौन्सिल ऑफ इंडियाचे संचालक, ह्युडे सोशल फौंडेशन ट्रस्टचे संचालक, एक्स्पोर्ट अँड फोरेन अफेअर्स कमेटीचे संचालक अश्या विविध जबाबदार पदावर ते कार्यरत आहेत. नाशिकमध्ये आयोजित या २२ व्या राष्ट्रीय स्पर्धेत भारताच्या विविध राज्यांचे ६३० खेळाडू सहभागी होणार आहेत. यामध्ये यजमान महाराष्ट्राबरोबर, कर्नाटक ,तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, गुजरात, राजस्थान दिल्ली, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम अश्या विविध राज्यांचा समावेश आहे. या स्पर्धेच्या या स्पर्धेचे उदघाटन शुक्रवार दिनांक २७ मार्च रोजी सकाळी १०.०० वाजता होणार असून रविवार दिनांक २९ मार्च रोजी सायंकाळी ५.०० वाजता या स्पर्धेमध्ये पहिले तीन क्रमांक मिळविणाऱ्या खेळाडूंना आणि संघांना पारितोषिके वितरित केली जाणार आहे अशी माहिती आयोजकांनी दिली. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विक्रम दुधारे, दीपक निकम, तन्मय कर्णिक, अविनाश वाघ यांच्यासह नाशिक जिल्हा आणि राज्याचे संघटक, कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande