महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त उद्या शिवा संघटनेची पूर्वतयारीसाठी बैठकीचे आयोजन
नांदेड, 27 मार्च (हिं.स.)। दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी क्रांतीसुर्यजगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची 895 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार असून शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांच्या नेतृत्वात मोठ्या थाटामा
महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त उद्या शिवा संघटनेची पूर्वतयारीसाठी बैठकीचे आयोजन


नांदेड, 27 मार्च (हिं.स.)। दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी क्रांतीसुर्यजगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची 895 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार असून शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांच्या नेतृत्वात मोठ्या थाटामाटात आयोजित करण्यात येणार आहे. महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त पुर्व नियोजनाची बैठक २८ मार्च रोज शनिवारी दुपारी 3 वाजता ठेवण्यात आली आहे. बैठकीचे अध्यक्ष म्हणून शिवा संघटनेचे उपाध्यक्ष वैजनाथ तोनसुरे हे उपस्थित राहणार आहेत. तसेच बैठकीस प्रमुख मार्गदर्शक म्हणून विठ्ठलराव ताकबिडे, प्रदेश प्रवक्ते संजय कोठाळे, राज्य सरचिटणीस शिवा कर्मचारी महासंघाचे इंजि. अनिल माळगे, जिल्हा संपर्कप्रमुख दिगंबर मांजरमकर

मराठवाडा उपाध्यक्ष, डॉ. वैजनाथ हंगरगे मराठवाडा संघटक यांच्या उपस्थित संपन्न होणार आहे.

नांदेड जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, व समस्त समाज बांधवांनी व महात्मा बसवेश्वर प्रेमींनी सह्याद्री ग्लोबल इंग्लीश स्कुल, लोकमित्र नगर हॉटेल चतुर्थीच्या पाठिमागे कॅनाल रोड, नांदेड येथे अगदी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन संभाजी पाटील जिल्हाध्यक्ष (दक्षीण), विलास कापसे जिल्हाध्यक्ष उत्तर, रविंद्र पांडागळे दक्षीण संभाजी पावडे उत्तर जिल्हाध्यक्ष शिवा कर्मचारी महासंघ नांदेड, श्गजानन कानडे महानगराध्यक्ष, शंकर अप्पा पत्रे, नंदु अप्पा देवणे, शुभम घोडके, संग्राम काडवदे, शिवराज उमाटे, नंदा पाटील, सत्यभामा ऐजगे आदीनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande