महावीर जन्मकल्याणनिमित्त मंगळवारी महारक्तदान, रथयात्रा आयोजन
छत्रपती संभाजीनगर, 29 मार्च (हिं.स.)। सकल जैन समाज अंतर्गत भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समिती २०२६ च्या वतीने ३१ मार्च रोजी भगवान महावीर जन्मकल्याण महोत्सवानिमित्त महारक्तदान, रथयात्रा, मिरवणूक यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे
महावीर जन्मकल्याणनिमित्त मंगळवारी महारक्तदान, रथयात्रा आयोजन


छत्रपती संभाजीनगर, 29 मार्च (हिं.स.)।

सकल जैन समाज अंतर्गत भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समिती २०२६ च्या वतीने ३१ मार्च रोजी भगवान महावीर जन्मकल्याण महोत्सवानिमित्त महारक्तदान, रथयात्रा, मिरवणूक यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे

सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दर्डा यांच्या अध्यक्षतेखाली सर्व सहा पंथ मिळून उत्सव एकत्र साजरा करतात. यंदा 'माझे शहर माझी जबाबदारी' ही टॅगलाइन ठेवण्यात आली आहे. सिडकोतील केशरबाग मंगल कार्यालय येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ३० मार्च रोजी महिला सांस्कृतिक कार्यक्रमाचे बक्षीस वितरण होईल. सायंकाळी सहा ते दहा दरम्यान तापडिया कासलीवाल ग्राउंड येथे जैन कॉन्सर्ट हा कार्यक्रम होईल.

३१ मार्च रोजी मंगळवारी महावीर जन्मकल्याणक दिनी सकाळी सहा वाजता शहराच्या विविध भागातून वाहन फेरी काढण्यात येईल. सकाळी सात वाजता महावीर स्तंभ येथे धर्मध्वजवंदन होईल. यावेळी सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दर्डा, सरचिटणीस महावीर पाटणी यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी, महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रतिक साहुजी, कार्याध्यक्ष अजय सिंघवी, सारिका साहुजी, सरचिटणीस बाहुबली वायकोस, ललिता साकला, पंकज साकला, मिठालाल कांकरिया आदींची उपस्थिती असेल. उत्तमचंद जैन छात्रालय, गुरुगणेशनगर येते ध्वजवंदन होईल. मंगळवारी सकाळी आठ वाजता पैठणगेट येथून रथयात्रेची सुरुवात होईल. महावीर जन्मकल्याण महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande