अकोला महापालिकेचा अर्थसंकल्प मंजूर
अकोला, 30 मार्च (हिं.स.)। अकोला महापालिकेचा 2026-27 या या वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज महापालिकेच्या सभेत मंजूर करण्यात आला आहे.. अकोला महानगरपालिकेच्या 1505.7 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला आजच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली आहे.. अर्थसंकल्पात
Photo


अकोला, 30 मार्च (हिं.स.)। अकोला महापालिकेचा 2026-27 या या वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज महापालिकेच्या सभेत मंजूर करण्यात आला आहे.. अकोला महानगरपालिकेच्या 1505.7 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला आजच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली आहे.. अर्थसंकल्पात भूमिगत गटार, शहर बस आणि रस्ते दुरुस्तीला प्राधान्य देण्यात आले असून हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक असल्याचा दावा करण्यात आला आहे.. या अर्थसंकल्पात भूमिगत गटार प्रकल्पाला गती देणे, जिगाव प्रकल्पातून नागरिकांना पाणीपुरवठा करणे, खोदलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करणे आणि शहरवासीयांना शहर बस सेवा उपलब्ध करून देणे यांसारख्या योजनांचा समावेश आहे.महानगरपालिकेच्या 2026-27च्या मूळ अंदाजपत्रकात महसुली आणि भांडवली खात्यांमध्ये 1.09 कोटी रुपयांची संभाव्य बचत दर्शविली आहे, परंतु प्रत्यक्षात काही कोटी रुपयांचे महसुली नुकसान झाल्याचा आरोप केला जात असून महापौर यांनी मात्र हा अर्थसंकल्प शहर वासियांसाठी सर्व समावेशक असल्याचं म्हटल आहे..

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande