अकोला जिल्ह्यात गॅस सिलेंडर वितरणाचा आढावा; अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन
अकोला, 30 मार्च (हिं.स.) : जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी अकोला शहरातील गॅस एजन्सींचा दौरा करून घरगुती गॅस सिलेंडर वितरणाचा आढावा घेतला. त्यांनी नागरिकांना वेळेत गॅस सिलेंडर उपलब्ध होण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना सुरू असल्याचे सांगितले आणि
Photo


अकोला, 30 मार्च (हिं.स.) : जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी अकोला शहरातील गॅस एजन्सींचा दौरा करून घरगुती गॅस सिलेंडर वितरणाचा आढावा घेतला. त्यांनी नागरिकांना वेळेत गॅस सिलेंडर उपलब्ध होण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना सुरू असल्याचे सांगितले आणि गॅस एजन्सीमध्ये अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन केले.

यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी रवींद्र यन्नावार व इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांनी एचपी अकोला गॅस एजन्सी तसेच मालीवाल भारत गॅस एजन्सी येथे भेट देऊन वितरण प्रक्रियेचा सखोल आढावा घेतला. त्यांनी नागरिकांशी संवाद साधून गॅस सिलेंडर वेळेत मिळत आहेत की नाही, याबाबत माहिती घेतली.

आढाव्यानुसार, घरगुती गॅसचा तुटवडा नाही आणि ग्राहकांची केवायसी प्रक्रियाही सुरळीत सुरू आहे. प्रशासनाने नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शासन-प्रशासनास सहकार्य करावे, असेही आवाहन केले आहे. पेट्रोलियम कंपन्यांशी दैनंदिन आढावा घेऊन गॅस सिलेंडर वितरण सुनिश्चित करण्यासाठी प्रशासन सतत प्रयत्नशील आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande