अकोल्यात महावीर जयंती उत्साहात
अकोला, 31 मार्च (हिं.स.)। जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जन्मोत्सवानिमित्त अकोला शहरात सर्वत्र भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. शहरातील विविध जैन मंदिरे व जैन स्थानकांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होत
Photo


अकोला, 31 मार्च (हिं.स.)। जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जन्मोत्सवानिमित्त अकोला शहरात सर्वत्र भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. शहरातील विविध जैन मंदिरे व जैन स्थानकांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सकाळपासूनच मंदिरांमध्ये भक्तांची मोठी गर्दी उसळली होती.

या पवित्र दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मंदिरांमध्ये भगवान महावीरांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन, अभिषेक आणि मंगल आरती करण्यात आली. श्रद्धाळूंनी भावपूर्ण वातावरणात भगवान महावीरांच्या उपदेशांचे स्मरण करत अहिंसा, सत्य आणि करुणेचा संदेश आत्मसात केला. श्री आदेश्वर मंदिर पेढी, गांधी चौक, ताजनापेठ येथे विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. हे सर्व कार्यक्रम प.पू. स्वाधीजी धैर्यनिधिश्रीजी महाराज आदी ठाणा ७ यांच्या पावन निश्रेत पार पडले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली धार्मिक विधी अत्यंत शिस्तबद्ध आणि पारंपरिक पद्धतीने संपन्न झाले. या निमित्ताने भव्य शोभायात्राही काढण्यात आली. शोभायात्रेत भगवान महावीरांच्या प्रतिमेची सुंदर सजावट करण्यात आली होती. ढोल-ताशांच्या गजरात आणि जयघोषात ही शोभायात्रा शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली. यामध्ये लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वच समाजबांधव उत्साहाने सहभागी झाले होते. शोभायात्रेनंतर स्वर्ण कलशाद्वारे भगवान महावीरांचे पूजन आणि अभिषेक करण्यात आले. त्यानंतर सकल जैन समाजाच्या वतीने स्वामीवात्सल्य भोजन प्रसादीचे आयोजन करण्यात आले. या प्रसादीचा लाभ मोठ्या संख्येने भाविकांनी घेतला. या संपूर्ण कार्यक्रमात जैन समाजातील श्रावक-श्राविका मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाद्वारे भगवान महावीरांनी दिलेला अहिंसा, संयम आणि सदाचाराचा संदेश समाजात रुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande