गुटखा विरोधी मोहीमेदरम्यान लातूरमध्ये 8.12 लाखांचा मुद्देमाल जप्त
लातूर, 31 मार्च (हिं.स.)। नांदेड परिक्षेत्रात सुरू असलेल्या गुटखा व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांविरोधातील विशेष मोहिमेला लातूर जिल्ह्यात यश मिळाले असून, पोलिसांनी छापा टाकून 8 लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत अवैध गुटखा वा
पोलीस कारवाई


लातूर, 31 मार्च (हिं.स.)। नांदेड परिक्षेत्रात सुरू असलेल्या गुटखा व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांविरोधातील विशेष मोहिमेला लातूर जिल्ह्यात यश मिळाले असून, पोलिसांनी छापा टाकून 8 लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली 16 ते 31 मार्च दरम्यान नांदेड परिक्षेत्रात व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान एका महिंद्रा कंपनीच्या बोलेरो वाहनातून गुटखा उदगीरकडे नेला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार 30 मार्च रोजी वाढवणा हद्दीत, उदगीर-अहमदपूर मार्गावर पोलिसांनी सापळा रचून बोलेरो वाहन अडवले. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये अवैधरित्या विक्रीसाठी नेला जात असलेला 2 लाख 49 हजार 600 रुपयांचा गुटखा आढळून आला. तसेच वाहनासह एकूण 8 लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी शेख शेख (वय 41, रा. भाग्यनगर, ता. अहमदपूर) आणि राजू गुरुलिंग हमणे (रा. भाग्यनगर, ता. अहमदपूर) यांच्याविरुद्ध वाढवणा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 81/2026 नोंद करण्यात आला आहे. आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलम 123, 62, 223, 274, 275, 3(5) तसेच अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

या कारवाईचा पुढील तपास वाढवणा पोलीस ठाण्याचे सपोनि सुनील गायकवाड करत आहेत.

दरम्यान, गुटखा, सुगंधित तंबाखू, पान मसाला, मावा आदी प्रतिबंधित पदार्थांचे उत्पादन, साठवण, वितरण व वाहतूक याविरुद्ध कडक कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

तसेच, नागरिकांनी आपल्या परिसरातील अवैध व्यवसायांची माहिती ‘खबर’ हेल्पलाईन क्रमांक 91 50 100 100 वर फोन किंवा व्हॉट्सअॅपद्वारे देण्याचे आवाहन पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande