
नाशिक, 31 मार्च (हिं.स.)। लाच स्वीकारताना जिल्हा परिषद बांधकाम विभागातील उपअभियंता व शाखा अभियंत्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.
भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई पार पडली. उपअभियंता विठ्ठल बाळाजी पठाडे (वय ५६) व शाखा अभियंता कृष्णकांत देवरे (२८) अशी अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. तक्रारदाराच्या कामाशीसंबंधित बिलाच्या प्रक्रियेसाठी आरोपींनी लाचेची मागणी केली होती. यामध्ये पठाण यांनी तीन लाख रुपये, तर देवे यांनी दोन लाख ६९ हजार रुपयांची मागणी केल्याचे समोर आले. तडजोडीनंतर देवरे यांनी लाच स्वीकारण्यास मान्यता दिली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पठाडे यांना तीन लाख रुपये स्वीकारताना पकडले. तसेच देवरे यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला असून, ते फरारी असल्याची माहिती आहे.
या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कारवाई पोलिस निक अमोल वालझाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. जिल्हा जलसंधारणा अधिकारी वैशाली ठाकरे यांना मार्चला लाचलुचपत प्रतिबंधक विभागले ताब्यात घेतले. त्यांना अद्याप जामीन मंजूर झालेला नसल्याने त्यांचा मुक्काम कारागृहातच आहे. या घटनेला दोन आठवडे होण्याअगोदरच बांधकाम विभागात दुसरी घटना घडली.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV