अशोक खरातच्या मुलगा एसआयटीच्या ताब्यात!, पत्न फरार
Ashok Kharat's son in SIT custody!, wife absconding 
Ashok Kharat's son in SIT


नाशिक, 31 मार्च (हिं.स.) : अशोक खरात याने महिलांवर केलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास सध्या पोलीस आणि एसआयटीमार्फत सुरू आहे. महिलांचे शोषण करण्याबरोबरच खरातने पैसेही उकळल्याचे समोर आले आहे. याच प्रकरणात त्याची पत्नी कल्पना खरातवर गुन्हा दाखल झाला आहे. खरातच्या पत्नीला अटक करण्यासाठी पथक आले होते, मात्र ती फरार झाली आहे. दरम्यान, पथकाने खरातच्या मुलाला ताब्यात घेतले आहे. दुसरीकडे खरात याची पोलीस कोठडी आज बुधवारी संपत असून न्यायालय काय निर्णय घेतो याकडे सगळ्यांचे लक्ष तर आहेत पण पोलीस काय भूमिका मांडतात याकडेही लक्ष लागले आहे

फसवणूक लैंगिक शोषण या प्रकरणांमध्ये 18 मार्च रोजी अटक करण्यात आलेल्या भोंदू बाबा अशोक खरात याची पोलीस कोठडी उद्या एक एप्रिल रोजी संपत आहे मागील तीन दिवसापासून तास न तास भोंदू बाबा खरात याची चौकशी करत आहे परंतु तो चौकशीला सहकार्य करत नाही असे एसटच्या वतीने सांगण्यात येत आहे असं सर्व असतानाच सोमवारी रात्री उशिरा शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये खरात व त्याच्या पत्नी सह इतरांवरती गुन्हा दाखल झाला. या सर्व प्रकरणांमध्ये आता तपास वेगाने सुरू झालेला आहे पण पोलिसांच्या हाती अजून काहीही लागलेले नाही त्यामुळे शिर्डी येथील गुन्ह्याच्या तपासात अशोक खरात यांची पत्नी कल्पना खरात हिला चौकशीसाठी बोलविण्याच्या तयारीत असताना ती फरार झाल्याचे समोर आले आहे

अशोक खरातची पत्नी कल्पना खरात हिच्यासह पाच जणांविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे कल्पना खरातही या प्रकरणात आरोपी बनली आहे. कल्पना खरातला अटक करण्यासाठी मंगळवारी सायंकाळी एसआयटी पथक खरातच्या घरी पोहोचले. पण, कल्पना खरात फरार झाल्याचे समोर आले. त्यानंतर पथकाने अशोक खरात यांच्या मुलाला ताब्यात घेतले. पथक अशोक खरातच्या मुलाला घेऊन गेले आहे. या संपूर्ण प्रकरणात त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. शिर्डीतील रावसाहेब गोंदकर यांनी अशोक खरात, त्याची पत्नी कल्पना खरात आणि इतर तिघे अशा पाच जणांविरोधात जमीन बळजबरी खरेदी केल्याची आणि कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande