अकोला- प्रमोद देंगे यांचे प्रशासनावर गंभीर आरोप; आत्मदहनाचा इशारा
अकोला, 04 मार्च (हिं.स.) – अकोला जिल्हा स्त्री रुग्णालय येथे कार्यरत असताना शासनाची रक्कम भरण्यात विलंब झाल्याच्या कारणावरून निलंबित करण्यात आलेल्या ग्रामीण रुग्णालय लोहो, जि. यवतमाळ येथील सहाय्यक अधीक्षक प्रमोद देंगे यांनी प्रशासनावर गंभीर आरोप के
Photo


अकोला, 04 मार्च (हिं.स.) – अकोला जिल्हा स्त्री रुग्णालय येथे कार्यरत असताना शासनाची रक्कम भरण्यात विलंब झाल्याच्या कारणावरून निलंबित करण्यात आलेल्या ग्रामीण रुग्णालय लोहो, जि. यवतमाळ येथील सहाय्यक अधीक्षक प्रमोद देंगे यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत.

देंगे यांच्या मते, शासनाच्या कामासाठी खर्च झालेल्या रकमेसंदर्भात सविस्तर स्पष्टीकरण आणि आवश्यक कागदपत्रे सादर करूनही त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. १५ सप्टेंबर २०२५ पासून वेतन व निर्वाहभत्ता न मिळाल्यामुळे त्यांच्या आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, ४ लाख ५१ हजार आणि ४२ हजार रुपये अशी एकूण रक्कम अद्याप परत मिळाली नसल्याची तक्रार त्यांनी केली आहे.

देंगे यांनी चौकशी अहवाल न देणे, संगनमताने कारवाई करणे आणि पदाचा गैरवापर झाल्याचे आरोप करत निलंबन तात्काळ रद्द करून थकीत वेतन देण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज त्यांनी अकोल्यातील आरोग्य उपसंचालक कार्यालयात आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. मात्र पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करून आंदोलन थांबवले. या घटनेमुळे प्रशासनात खळबळ उडाली असून पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

-------------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande