
नाशिक, 04 मार्च (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मुंबई व कार्यालय, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हंगाम 2025-26 मध्ये राज्यात केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार NCCF मार्फत चना खरेदीसाठी आधारभूत दर रूपये 5 हजार 650 प्रति क्विंटल असा निश्चित केला आहे. शेतकऱ्यांनी आधारभूत दरानुसार चना खरेदी योजनेचा लाभ घेण्यासाठी 31 मार्च 2026 पर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी भारतभूषण पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
शेतकऱ्यांनी चना विक्रीकरिता आपल्या गावाजवळील NCCF च्या खरेदी केंद्रावर जावून 7/12 उतारा( ऑनलाइन पिकपेरा असलेला), आधार कार्ड, बँकेचे पासबुक सोबत नेवून नोंदणी करावी. सदर नोंदणी ही POS मशीनने करण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांनी आवश्यक कागदत्रांसह प्रत्यक्ष खरेदी केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. खरेदीकरिता मोबाइलवर एस.एम.एस प्राप्त झाल्यानंतर शेतमाल विक्रीसाठी केंद्रावर घेवून यायचे आहे.
जिल्ह्यात आधारभूत दराने चना खरेदीसाठी 5 खरेदी केंद्रांना शेतकरी नोंदणीसाठी NCCF कडून मान्यता देण्यात आली आहे.
असे आहेत मंजूर खरेदी केंद्र, संपर्क अधिकारी व संपर्क क्रमांक1.येवला- येवला तालुका सह. खरेदी विक्री संघ, बाबासाहेब जाधव- 94231763492.मालेगाव- शेतकरी सह. संघ,लि.मालेगाव, पांडूरंग बच्छाव-89994699903.देवळा- देवळा ता.सह.ख.वि.संघ लि. देवळा, गौरव आहेर-97675796144.निफाड- कृषीसाधना म.फळे व भाजी. सह. संस्था लि. विंचूर, गौरव जाधव- 70385053865.सिन्नर- सिन्नर तालुका सह. खरेदी विक्री संघ लि. सिन्नर, दत्तात्रय राजेभोसले- 9767602852
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV