कोल्हापूरमध्ये अनुसूचित जाती आरक्षणाच्या गैरवापराविरुद्ध भव्य संघर्ष महामोर्चा
कोल्हापूर, 04 मार्च (हिं.स.)। अनुसूचित जाती आरक्षण बचाव जनआंदोलन समितीने खोट्या जात प्रमाणपत्रांच्या आधारावर निवडणुका लढवून संवैधानिक आरक्षणाचा गैरवापर करणाऱ्या राजकारण्यांविरुद्ध ९ मार्च रोजी “भव्य संघर्ष महामोर्चा” आयोजित करण्याची घोषणा केली आहे.
आरक्षण बचाव जनआंदोलन समिती


कोल्हापूर, 04 मार्च (हिं.स.)। अनुसूचित जाती आरक्षण बचाव जनआंदोलन समितीने खोट्या जात प्रमाणपत्रांच्या आधारावर निवडणुका लढवून संवैधानिक आरक्षणाचा गैरवापर करणाऱ्या राजकारण्यांविरुद्ध ९ मार्च रोजी “भव्य संघर्ष महामोर्चा” आयोजित करण्याची घोषणा केली आहे.

समितीच्या पत्रकार परिषदेत उत्तम कांबळे, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, माजी आमदार राजीव आवळे, नगरसेवक दुर्वास बापू कदम आणि पॅंथर शिवाजीराव कवाळे यांनी माहिती दिली. समितीच्या आरोपानुसार, श्री दरगोंडा बसगोंडा पाटील (महेश पाटील) यांनी पट्टणकोडोली येथून खोट्या एससी-लिंगडेर जात प्रमाणपत्रावर निवडणूक लढवून सत्तेत प्रवेश केला आहे. यासह गडहिंग्लज-नगराध्यक्ष श्री महेश महादेव तुरबतमठ आणि इचलकरंजी नगरसेविका सौ. अलका अशोक स्वामी यांनीही एससी आरक्षणाच्या जागांवर खोट्या प्रमाणपत्रांद्वारे निवडणुका लढवल्या आहेत.

समितीने म्हटले की, हा प्रकार फक्त कायद्याचा भंग नाही, तर अनुसूचित जाती समाजाच्या हक्कांवर थेट आघात आहे. त्यामुळे खऱ्या एससी उमेदवारांच्या संधीवर परिणाम होतो, आणि समाजाच्या भावी पिढीचे भविष्य अंधारात जाते.

समितीने तात्काळ संबंधितांची जात प्रमाणपत्रे रद्द करून पदे बरखास्त करावी, दोषींवर कठोर फौजदारी कारवाई करावी, आणि शासनाने जात पडताळणी प्रक्रिया अधिक कडक व पारदर्शी करावी, अशी मागणी केली आहे.

महामोर्चाला बौद्ध, मातंग, चर्मकार, खाटीक, वाल्मिकी व बुरुड समाजाचे मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

----------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande