नाशिक - हिरे महाविद्यालयात वादविवाद स्पर्धेचे पारितोषिक वितरण
नाशिक, 04 मार्च (हिं.स.) : महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयात ५३ व्या कर्मवीर भाऊसाहेब हिरे राष्ट्रीय आंतरमहाविद्यालयीन वाद-विवाद स्पर्धेचे पारितोषिक वितरण उत्साहात पार पडले. स्पर्धेत देशभरातील १५६ स्पर्धकांनी स
Prize distribution ceremony


नाशिक, 04 मार्च (हिं.स.) : महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयात ५३ व्या कर्मवीर भाऊसाहेब हिरे राष्ट्रीय आंतरमहाविद्यालयीन वाद-विवाद स्पर्धेचे पारितोषिक वितरण उत्साहात पार पडले. स्पर्धेत देशभरातील १५६ स्पर्धकांनी सहाग नोंदवला.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य माजी आ. डॉ. अपूर्व हिरे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अभिजित मोदी, संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. हरीश आडके, प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे उपस्थित होते.उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. अपूर्व हिरे म्हणाले, कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांचे शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि सर्वसामान्यांच्या उन्नतीसाठी केलेले कार्य प्रेरणा देणारे आहे. तसेच सदर स्पर्धा केवळ वत्कृत्वाची चाचणी नसून विचारांच्या परिपक्वतेची, सामाजिक जाणिवेचीआणि तर्कशक्तीची कसोटी आहे.

भाषावार झालेल्या स्पर्धेत मराठी माध्यमात यश पाटील (प्रथम), तेजस पाटील (दुसरा), रोहन कवडे (तिसरा), नितीन गागरेने चौथा क्रमांक पटकावला. हिंदी भाषेत अनुक्रमे सार्थक सिंग, रितेश तिवारी, शंकर मुथे, अनुराग शुक्ला यांनी बक्षिसे पटकावली. तर इंग्रजी भाषा विषयात पार्थ शेळके, निवासीनी गोविंदराज, आर्या जाधव, भुमाईरथ फारुकी यांनी अनुक्रमे एक ते चार क्रमांक पटकावले. वैयक्तिक गटात मिहरोज शेख, आईशी कृष्णकांत, अंकित कुमार यांनी बाजी मारली. परीक्षक म्हणून प्रा. डॉ. जयश्री भालेराव, प्रा. डॉ. सी. ए. देवेंद्र दगडे, प्रा. डॉ. अनंत केदारे यांनी काम पाहिले. यावेळी प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे, डॉ. राकेश पाटील, प्राचार्य डॉ. सी. जी. दिघावकर, प्राचार्य डॉ. डी. बी. शिंदे, प्राचार्य डॉ. संतोष तांबे, श्यामकांत भंडारी, डॉ. प्रदीप जी. एल., डॉ. मनीषा गायकवाड, प्रा. दीप्ती देवरे, डॉ. प्रकाश शेवाळे आदी उपस्थित होते

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande